Yashwantrao Chavan Speech In Marathi: महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण भाषण मराठी

Yashwantrao Chavan Speech Marathi: महाराष्ट्राच्या इतिहासात यशवंतराव चव्हाण यांचे योगदान हे अभूतपूर्व आहे. सामान्य माणसापासून ते देशाच्या उपपंतप्रधानपदी पोहोचलेला हा महामानव, त्यांची कार्यकाळातील प्रगल्भता आणि जनतेप्रती असणारी तळमळ आजही प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन, महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट करणारे आणि सहकार चळवळीला बळ देणारे हे नेतृत्व आजही सर्वांच्या हृदयात अढळ स्थान मिळवते. त्यांच्या जीवनप्रवासाचे हे भाषण त्यांच्या महान कार्याची आठवण करून देतो, ज्यामुळे महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव होतो.

Yashwantrao Chavan Speech In Marathi

महाराष्ट्र म्हटलं की मुंबई आणि मराठी माणूस यांची अग्रक्रमाने आठवण होते. महाराष्ट्राचा इतिहास आठवला की संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण होते. स्वातंत्र्य लढ्यातल्या महापुरुषाच्या योगदानाची तितकीच आठवण येते. महाराष्ट्र निर्मितीसाठी धडपडणाऱ्या सह्याद्रीच्या सुपुत्राचीसुद्धा तितकीच आपल्याला जाणीव होते.

महाराष्ट्र म्हटलं की मुंबई आणि महाराष्ट्राची जडणघडण आणि शिल्पकार म्हटलं आपल्याला जाणीव होते महाराष्ट्राच्या शिल्पकाराची. त्याच शिल्पकाराचे नाव आहे यशवंतराव बळवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१४ साली (पूर्वीचा सातारा) जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी झाला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, खडतर जीवन प्रवासामध्ये ज्ञान घेणारे आदरणीय (Yashwantrao Chavan Marathi Speech) चव्हाण साहेब प्राथमिक शिक्षण हे कऱ्हाडच्या टिळक हायस्कूलमध्ये घेतले. तिथंच खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण ही झालेली पाहायला मिळते. वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचे निधन हा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा दु:खाचा प्रसंग.

यशवंतरावांच्या आईना (विठाबाई) नेहमी वाटत असे आपण निरक्षर असलो तरी आपली मुलं साक्षर, सक्षम व्हावी ही त्यांची तळमळीची इच्छा. भावाच्या अग्रहाखातर यशवंतराव चव्हाण यांनी मोठ्या जिद्दीने, कष्टाने आपले शिक्षण पूर्ण केले.

ज्यावेळी शाळेमध्ये यशवंतरावांना त्यांच्या शिक्षकांनी विचारलं ‘बाळ तुला तुझ्या आयुष्यात काय करायचे आहे?’ तर ‘लोकांची मदत (लोकसेवक) व्हायचं आहे.’ हे यशवंतराव चव्हाणांचे उत्तर. जीवनामध्येच क्रांतिकारक विचाराचे असणारे यशवंतराव परकीय सत्तेच्या विरोधात बंड करत होते.

त्यांची रोखठोक वृत्ती ही त्यांच्या सहकारी मित्रांना आवडत होती. १९३२ आणि १९३३ च्या कालखंडामध्ये त्यांच्या क्रांतिकारक विचारामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगामध्ये १ वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिले.

त्याच कालखंडामध्ये क्रांतिवीर स्वातंत्र्य सैनिक यांच्याशी त्यांचा सहवास वाढत गेला. येथूनच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य चळवळीच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वास सुरुवात झाली. मितभाषी स्वभावाचे यशवंतराव चव्हाण सर्वसामान्य जनतेला आपलेसे वाटत होते. १९४२ साली फलटणच्या वेणूताईंशी त्यांचा विवाह झाला.

महाराष्ट्रामध्ये ज्या कालखंडामध्ये काँग्रेस पक्ष अडचणीत होता. त्यावेळी नेहरूंच्या आग्रहाखातर त्यांनी काँग्रेस पक्ष सांभाळण्याचे कार्य केले. पण त्याचबरोबर मराठी माणसांच्या वेगळ्या राज्यासाठी सक्रिय झालेले यशवंतराव चव्हाण पाहावयास मिळतात.

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील क्रांतिकारकांच्या हौतात्म्याने महाराष्ट्रातील नेतृत्वामुळे वेगळ्या राज्याची निर्मिती झाली नेहरूंनी महाराष्ट्राचे नेतृत्व आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड केली.

यशवंतराव चव्हाणांनी सक्षमपणे महाराष्ट्राची जडण-घडण करण्यासाठी प्रयत्न केले. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये विद्यापीठाची स्थापना, गोरगरिबांसाठी शैक्षणिक सवलती वेगवेगळी कृषी केंद्रे, सहकारी कारखाने संस्था याची स्थापना करून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये सहकार चळवळ पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले.

१९६२ साली चव्हाणसाहेब देशाचे संरक्षणमंत्री झाले. १९६४ साली नेहरूंच्या निधनानंतर आणि त्यानंतर शास्त्रींचे निधन या कालखंडामध्ये काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले चव्हाणसाहेब पाहायला मिळतात. केंद्रामध्ये संरक्षणमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्ष नेत, १९७९ साली या देशाच्या उपतंप्रधानपदी निवड झाली.

यातूनच खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रगल्भ नेतृत्वाचे दर्शन घडते. अशा या महान व्यक्तीचे निधन २५ नोव्हेंबर १९८४ साली दिल्ली या ठिकाणी झाले. सामान्य माणूस ते स्वातंत्र्य सैनिक, निष्णात वकील ते विरोधी पक्ष नेता व या देशाचा उपपंतप्रधान हा त्यांचा प्रवास आजही आपणास प्रेरणादायी ठरतो.

आजही त्यांचे कृष्णाकाठचे वैभव, ऋणानुबंध ‘सह्याद्रीचे वारे’ या पुस्तकातून यशवंतराव चव्हाणांच्या विविध पैलूंची या पुस्तकातून ओळख होते. चव्हाणसाहेब हिमालयाच्या उंचीएवढे त्यांचे कर्तृत्व मोठे होते. सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना राजकारणासारख्या क्षेत्रामध्ये आणून त्यांना मोठं करण्याचं कार्य चव्हाणसाहेबांनी केले आहे.

महाराष्ट्राच्या मातीला विकासाचे तीर्थक्षेत्र बनविण्याचे कार्य केले व शेती आणि शेतकरी, कामगार, श्रमजीवी आणि बुद्धिजीवी वर्गासाठी कल्याणकारी योजना राबवून लोकांचा विकास करणारे महामानव होते. महाराष्ट्रातला व देशातला प्रत्येक माणूस चव्हाणसाहेबांचा उल्लेख करताना महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण असाच करतात.

निष्कर्ष

यशवंतराव चव्हाण यांचे जीवन म्हणजे (यशवंतराव चव्हाण मराठी भाषण) एक प्रेरणादायी संघर्ष आणि अढळ ध्येयाचे प्रतीक आहे. सामान्य माणसासाठी कार्य करणारा एक नेता, महाराष्ट्राच्या उभारणीसाठी झटणारा एक शिल्पकार आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणारा एक महामानव म्हणून त्यांचे कार्य अजोड आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा पाया त्यांनी घातला आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्याला आजचा आधुनिक चेहरा प्राप्त झाला आहे. त्यांच्या कार्याचा ठसा कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या हृदयात आहे आणि पुढील पिढ्यांना ते नेहमीच प्रेरणा देतील.

Leave a Comment