शिक्षक दिन भाषण मराठी | Teachers Day Speech In Marathi

भारतात दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन (शिक्षक दिन मराठी भाषण | Teachers Day Speech In Marathi) साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान विद्वान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी केली जाते. शिक्षक दिन हा सर्व शैक्षणिक संस्थांसाठी एक महत्त्वाचा प्रसंग आहे आणि सर्व आदरणीय शिक्षकांच्या कठोर परिश्रम आणि शिकवणीचा सन्मान करतो. हा दिवस शाळेसाठी खूप उत्साहाने आणि उत्सवांनी भरलेला आहे आणि त्यानंतर शिक्षक दिन साजरा करणारे भाषण. म्हणून, आम्ही येथे शिक्षक दिनानिमित्त एक भाषण दिले आहे ज्याचा संदर्भ विद्यार्थ्यांना घेता येईल. या लेखात एक जबरदस्त भाषण जे सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात.

Teachers Day Speech In Marathi

Teachers Day Speech In Marathi

Teachers Day Bhashan In Marathi | शिक्षक दिन भाषण इन मराठी

गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण जगी न होई सन्मान,
जीवन भवसागर तराया,
चला वंदूया गुरुराया,

कालखंडापासून आपल्या देशामध्ये गुरुपरंपरेला फार महत्त्व आहे. पूर्वी या देशामध्ये गुरूच्या कुलात जाऊन विद्यार्थी ज्ञानाचे धडे घेत होते. त्या पद्धतीला शिक्षण पद्धती असे आपण पाहतो. आजया देशामध्ये मुले शाळेत जाऊन शिकू लागली. पूर्वा शिक्षण हे वनामध्ये दिले जायचे. आज शिक्षण हे शाळेमध्ये दिले जाते. विद्यार्थ्यांची जडणघडणीत त्याच्या गुरुजनांचे योगदान महत्त्वाचे असते. आपल्या देशामध्ये त्याच गुरुजनांचा सन्माननीय शिक्षकांचा यथोचित सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याचा आढावा, मागोवा लोकांनी घ्यावा याचसाठी शिक्षक दिन हा साजरा केला जातो. भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन, शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

एक सामान्य माणूस, उत्तम शिक्षक ते उत्तम प्रशासक या देशाचे राष्ट्रपती हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा प्रवास सर्वांच्या समोर आदर्श प्रेरणादायी पहावयास मिळतो. आज शिक्षक दिन साजरा करत असतांना आपण आपल्याला ज्ञानाचे, जीवनाचे, आयुष्याचे, कला, क्रीडा, साहित्य यासारख्या क्षेत्रामध्ये आपणास घडवणाऱ्या गुरुवर्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करत असतो. शिक्षक तन, मन, धन, अर्पण आणि समर्पित करून एक पिढी घडविण्याचे पवित्र कार्य करत असतात. या देशामध्ये शिक्षण हे पूर्वी विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती, पण हे शिक्षण आजसर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचले. या शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक आपणास आपलं आयुष्य संस्कारमय, शिस्तबद्ध परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असत. याचाच आदर्श आपण घेतला पाहिजे.

शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. अज्ञांनी मुलाला ज्ञानी बनवतो. विद्यार्थ्यांमधील दुर्गुण बाजूला काढून त्याच्या सद्गुणाना वाव देतो. उत्तम खेळाडू, उत्तमप्रशिक्षक, उत्तम वक्ता, उत्तम वैज्ञानिक घडविण्यासाठी शिक्षक हे अविरत पणे कार्य करत असतात. समाजाला अशा शिक्षकांची गरज असते. आज देशभरात जगभरात शिक्षकांच्याकडे पाहिले तर हे शिक्षक विद्यार्थ्यांवरती चांगले संस्कार करत असतात. शिक्षकांना सर्वांत जास्त आनंद केव्हा  मिळत असतो. आपला एखादा विद्यार्थी सामान्य असेल, पण तो जेव्ह त्यांच्या हाताखाली घडतो व उत्तम व्यक्ती म्हणून ज्यावेळी समाजात वावरत असतो. त्यावेळी शिक्षकांना आनंद होत असतो. आज शिक्षकांनी आपल्यासमोर वेगवेगळ्या क्षेत्रातील आदर्श ठेवण्याचे कार्य करतात. व्यक्ती मनुष्य आणि विद्यार्थी समाज या सर्व गुणांचा अभ्यास करून शिक्षक एक विचारांची चौकट आपल्यासमोर निर्माण करतात यातून आपण गुरुजनांच्या विचारांचा आदर्श घेतला तर एक नवा समाज, नवी पिढी निर्माण होऊ शकते.

शिक्षण हे प्रत्येक क्षणाला आपल्याला नवीन काहीतरी शिकवण्याचे कार्य करते. तर शिक्षक आपल्याला कृतिशील व्यक्ती बनवण्याचे कार्य करतात. शिक्षक दिनाच्या माध्यमातून या देशामधील करोडो शिक्षकांच्या विचारांनुसार आपण जर आपली योग्य पद्धतीने वाटचाल केली तर एक संस्कारमय, संस्कृतीरक्षकं, वैज्ञानिक दृष्टिकोण असणारा विद्यार्थी समाजातून निर्माण होऊ शकतो.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी गुरुजींच्या वाणीतून व कृतीतून येणाऱ्या गोष्टींचा संग्रह करून आपण वाटचाल केली तर यशाचा आनंदसुद्धा आपल्याला घेता येऊ शकतो. यासाठीच शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रामाणिकपणे पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गुरुजींच्या विचारांचा आदर्श घेतला पाहिजे.

जय हिंद, जय महाराष्ट्र !


आम्हाला आशा आहे की शिक्षक दिन भाषण मराठी, मराठी भाषण शिक्षक दिनानिमित्त, 2 मिनिटे शिक्षक दिन भाषण, 5 मिनिटे शिक्षक दिन भाषण मराठी, Speech On Teachers Day In Marathi हे भाषण नक्की आवडले असेल, धन्यवाद

Leave a Comment