Sant Tukaram Maharaj Speech In Marathi: संत तुकाराम महाराज यांच्यावर मराठी भाषण

Sant Tukaram Maharaj Speech Marathi: संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक तेजस्वी आणि आदरणीय संत होते. त्यांची कीर्तने, अभंग, आणि समाज सुधारण्यासाठी केलेली कार्ये आजही लोकांच्या हृदयात जागृत आहेत. “जे का रंजले-गांजले, त्यासी म्हणे जो आपुले” या त्यांच्या अमर वचनातच त्यांच्या जीवनाचे सार आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून भक्ती, ज्ञान, आणि समाजसेवेचा महामार्ग दाखवला. पांडुरंगाच्या भक्तीत लीन होऊन त्यांनी लोकांचे प्रबोधन केले आणि एकता, समता आणि सत्याचा मार्ग दाखवला. आज या लेखामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या वर मराठीत भाषण दिलेले आहे.

Sant Tukaram Maharaj Speech In Marathi

जे का रंजले-गांजले । त्यासी म्हणे जो आपुले।।
तोची साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा ।।
मृदू सवाद्य नवनीत। तैसे सज्जनांचे चित्त।।

या उक्तीप्रमाणे घरामध्ये राहूनसुद्धा जेथे आहे तेथे कार्य करत, काम करत परमेश्वराचे पांडुरंगाचे दर्शन घेता येते हे त्यामहान मानवाने सांगितले. त्या महान मानवाचे नाव आहे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंद्रायणीच्या काठी देहू या गावी शके १५१० इ. रोजी झाला.

तुकारामांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले. घरामध्ये वारकरी संप्रदायाचे वातावरण असणाऱ्या घरात तुकारामांचा जन्म झाला. वाचन, चिंतन आणि मनन यामध्ये सदैव मग्न असणाऱ्या तुकारामांनी अभंगाच्या माध्यमातून आपली प्रगल्भता दाखवून दिली.

दिवसा दुकान चालविणे रात्री कीर्तनात रमणे, पहाटे विठ्ठलाची पूजा करणे हा तुकारामांचा दिनक्रम.
भंडारदरा डोंगरावर तुकारामांनी एकांतात आपले लिखाण केले. सदैव विठ्ठल भक्तीमध्ये रमत जाऊन तुकारामाने रामकृष्ण हरी मंत्र जपत आपली विठ्ठलाची सेवा केली.

ज्या कालखंडामध्ये तुकारामांची कीर्तने मोठ्या प्रमाणात होत होती. त्यावेळी या देशातल्या सनातनी विचारांच्या लोकांनी तुकारामांना हिणवण्याचे कार्य केले. मंबाली नावाच्या गृहस्थाने तुकारामांच्या लिहिलेल्या वह्या इंद्रायणीत फेकून दिल्या. अशा खडतर प्रवासामध्येसुद्धा अनंत अडचणींना सामोरे जाऊन तुकारामांनी पुन्हा आपले लिखाण सुरूच ठेवले.

संत तुकारामांची कीर्ती ऐकून छत्रपती शिवाजी महाराज एकदा आळंदीला संत (Sant Tukaram Maharaj Bhashan Marathi) तुकाराम महाराजांचे विचार ऐकण्यासाठी गेले होते. म्हणजे तुकारामांची ख्याती खूप दूरवर पसरली होती. तुकारामांचे कीर्तन ऐकून प्रभावित झालेल्या छत्रपती ● शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचा यथोचित सन्मान केला.

ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केलेल्या भागवत धर्माची पताका खांद्यावरती घेऊन ती अखंडपणे पुढे सुरू करण्याचे कार्य संत तुकाराम महाराजांनी केले. अठरा पगड जातीच्या लोकांना संघटित करून त्या सर्व लोकांचे प्रबोधन करण्यासाठी तुकाराम महाराजांनी प्रयत्न केले.

आज त्यांचे साडेचार हजारहून अधिक अभंग पाहावयास मिळतात. संत तुकाराम हे नुसतेच कीर्तन करत नव्हते तर तितकेच ‘पर्यावरणवादी, निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे रक्षण करा’ म्हणणारे संत होते.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ।
पक्षीही सुस्वरे आळविती ।।
तेणे सुखे रूपे एकांताचा वास ।
नाही गुणदोष अंगा येत ।।

विठ्ठलाचे नामस्मरण करत. कीर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी स्वराज्यातील कष्टकरी जनतेचा मार्गदर्शक संत म्हणून तुकाराम यांच्याकडे पाहिलं जातं. समाजातल्या लोकसंख्येविषयी स्वतःचे परखड मत मांडणारे तुकाराम हे जितकेच स्पष्टवक्ते म्हणून पाहावयास मिळतात.

समाजातल्या रूढी परंपरेबरोबर ज्वलंत प्रश्नांची मांडणी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून करणारे एक आधुनिक संत तुकारामांच्याकडे पाहिले जाते. कीर्तनातून विठ्ठल-भक्तीचा महिमा प्रकट करून बुवाबाजीला प्रखर विरोध करून थेट भक्तिमार्गाची जाणीव करून देणारे संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो.

निष्कर्ष

संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातून समाजाला नवा दृष्टिकोन दिला. (संत तुकाराम महाराज भाषण मराठी) त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचा आणि सेवाभावाचा संदेश दिला. त्यांच्या अभंगांमध्ये सामाजिक सुधारणा, पर्यावरणाचे रक्षण आणि मानवतेचा उद्गार आढळतो. आजच्या युगातही तुकाराम महाराजांचे विचार आपल्याला जीवनाची खरी दिशा दाखवतात. अशा या थोर संताचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील.

Leave a Comment