पुणेरी पाट्या मराठी मध्ये | Puneri Patya In Marathi Latest For Whatsapp, Facebook, Sharechat With Images

पुणेरी पाट्या” म्हणजेच पुण्याच्या खमक्या आणि खट्याळ स्वभावाचे जिवंत चित्रण करणाऱ्या विनोदी आणि उपदेशपर सूचना! पुण्याच्या गल्ल्यागल्ल्यांत आणि दुकानांच्या भिंतीवर दिसणाऱ्या या पाट्या स्थानिक जनतेच्या रोजच्या जगण्यातील खास शैलीची साक्ष देतात. या पुणेरी मराठी पाट्या वाचल्यावर तुमच्या चेहऱ्यावर हसू येतेच, पण त्यात लपलेला उपदेशही जाणवतो. चला, या मजेदार आणि विचारप्रवर्तक पुणेरी पाट्यांचा एकत्रित आनंद घेऊ या.

Puneri Patya In Marathi

🔸सेल्समनांस सुचना:
सदर इमारतीत विक्री न झाल्यास
सोसायटी जबाबदार नाही🔸

🔸हे कार्यालय आहे
आत पाहण्या सारखे काही नाही
आत येऊ नये🔸

🔸सोसायटीच्या सभासदांशिवाय अन्य
अवजड वाहनांस प्रवेश वर्ज्य🔸

🔸सेल्समननी आत येऊ नये
सेल्सगर्ल आत आल्यास
मालक जबाबदार नाही🔸

🔸साने येथेच राहतात
उगीच भलतीकडे
चौकशी करू नये🔸

🔸शांतता राखा
थुंकू नका
माणसासारखे वागा🔸

🔸वेटरला टिप देऊ नये
आम्ही त्यांना पुरेसा पगार देतो🔸

🔸वाचनालयात शांतता राखावी
अन्यथा कधीही आत न
घेण्यासाठी बाहेर काढण्यात येईल🔸

🔸लाईट गेल्यास कॆण्डल-लाईट
डिनरचा वेगळा चार्ज पडेल🔸

🔸लग्न अशी एकमेव जखम आहे
जी होण्याआधीच हळद लावली जाते🔸

मराठी पुणेरी पाट्या

🔸रंग ओला आहे
विश्वास नसेल,
तर हात लावून पहावे🔸

🔸येथे वाचायला चष्मे मिळतील
पण आपल्याला अक्षर ओळख आहे ना ?
मागाहून तक्रार चालणार नाही🔸

🔸येथे थुंकल्यास तुमचा
माणूस बरा होणार नाही🔸

🔸येथे चोरी करणारा नेहमी पकडला
जातो याची कृपया नोंद घ्यावी🔸

🔸येथे एरंडेलाचा डोस देण्यात येईल
(पुढील क्रियामात्र घरी जाऊन करावी)🔸

🔸मंगळावर गेलेल्या यानाला तेथे एक पुणेरी हॉटेल दिसले, तेथील काही पाट्या
मंगल उपहार गृह
खडकमाळ आळी , मंगळवार पेठ.
वेळ: सकाळी 9 ते 11,
संध्याकाळी 5 ते 7

ग्राहकांसाठी सूचना

1. आपली याने स्वतःच्या जबाबदारीवर लावावीत .
2. कृपया पाणी मागु नये .
3. जादा ऑक्सीजन वाटीचा वेगळा आकार पडेल.
4. सकाळी 11 आणि संध्याकाळी 7 नंतर ऑक्सीजन बंद होईल तरी त्यानंतर ग्राहकांनी थांबू नये.
5. आमची इतर कोणत्याही ग्रहावर शाखा नाही.
ता.क.:-
स्वतःला मंगळ आहे, हे सांगून उगीच डिस्काऊंट मागू नये.
आपला,
ग्र. ह. मंगळवेढेकर🔸

🔸भिकारी लोकांस सुचना:
कुत्रे व भुतांपासून सावध रहा🔸

🔸भिंती रंगवण्याची जबाबदारी
कोणावरही दिली नसून ती जबाबदारी
भिंतीवर थुंकून पार पाडू नये ही नम्र विनंती🔸

🔸बाहेरील पदार्थ आत आणू नयेत
आतील पदार्थ बाहेर नेऊन खाल्ले तर चालेल🔸

Puneri Patya Marathi

🔸बंगला रिकामा आहे
आत चोरण्यासारखे काहिही नाही
विनाकारण कष्ट घेऊ नये🔸

🔸फोटो खराब आल्यास
वडिलांना जाब विचारावा
आम्हास नाही🔸

🔸फुंके (सिगारेट्स्), थुंके (तंबाखू)
आणि शिंके (तपकीर)
यांना रंगमंदिरात मज्जाव🔸

🔸प्रगती आहे की गती आहे
तेच कळेनासे झालेय🔸

🔸पोरी आल्या तर येऊ दे,
अन् गेल्यातर जाऊ दे,
आपला तर एकच उसुल,
आली तर  Welcome,
नाहीतर  गर्दी कम🔸

🔸पुणेरी PJ चा कहर आहे रे बाबा…!
हनी सिंग च्या मोठ्या भावाचं नाव काय..??
“ज्येष्ठ मध..”🔸

🔸पत्ता सांगायचे ५ रूपये पडतील
हे असे का लिहीले आहे हे
सांगायचे १० रूपये पडतील🔸

🔸दारावरील बेल फ़क्त एकदाच वाजवावी
विजेचे बिल आम्ही भरतो🔸

🔸तीनदा दार वाजवूनही दार उघडले नाही,
तर मालकाला आपणास भेटावयाचे नाही असे समजावे🔸

🔸गाडीमध्ये तंबाखू खाऊन बसू नये
व बसून तंबाखू खाऊ नये🔸

पुणेरी पाट्या मराठी मध्ये

🔸केवळ पैसे दिले म्हणजे काहीही करता येईल असे समजू नये;
त्यासाठी शहरात अजूनहीजागा आहेत. आमच्या सौजन्याला मर्यादा आहेत,
याचे भान ठेवावे🔸

🔸कृपया वस्तू ऊधार मागू नये
अपमान होईल🔸

🔸कृपया चूळ भरताना घाणेरडे
आवाज काढू नयेत🔸

🔸कृपया
ग्राहकांनी मराठीतच
बोलावे🔸

🔸कुत्र्यांपासून सावध रहा
नको तिथे चावल्यास
आम्ही जबाबदार नाहीत🔸

🔸कुणालाही उदारी मिळणार नाही🔸

🔸एका जेवणालयातील पाटी:
जेवण झाल्यानंतर उगाच इथे गप्पा मारू नये🔸

🔸एका जिन्यातील पाटी:
वर चढताना ५वी पायरी तुटलेली आहे🔸

🔸एका घरासमोरील पाटी:
देशपांडे कुठे राहतात ते आम्हाला माहित नाही.
उगाच घंटी वाजवून विचारू नका🔸

🔸एकदा या घरी
याचा अर्थ घरी एकदाच या🔸

पुणेरी पाट्या दुकानासाठी

🔸एक पुणेरी त्याच्या नात्यातल्या लगनात जाऊन येतो.
शेजारील हिंदी भाषिक त्याला लग्नाबद्दल विचारपुस करतो..
शेजारी : फिर.. कैसा हुवा शादी..?
पुणेरी : एकदम अच्छा, वर ने वधु के और वधु ने वर को हार गळेमे टाक्या…
फिर दोनो ने एकमेक को घास खिलाया..!
शेजारी : तुम्हारे यहा शादी मे घास भी खाते है..?
पुणेरी : नही…, वो ताट मे भात लेके उसपे वरण डालके उसपे तूप डालके, उसको कालव कालव कालवके उसको ऐसा गोळा करके वर और वधु एकमेक के तोंड मे भरवते है ना उसे हम घास बोलते है..!🔸

🔸एक काळा माणुस मरतो आणि र्स्वगात जातो !
पुणेरी अप्सरा:” कोन आहे तु ??
माणुस-( to impress) मी HERO आहे TITANIC चा..
पुणेरी अप्सरा :” अरे काळ्या Titanic बुडली होती जळाली न्हवती🔸

🔸ए नाही अहो रिक्षावाले म्हणा🔸

🔸इथे हापूस आंबे, कोकम सरबत
व परकर मिळतील🔸

🔸इथे कम्प्युटर सीडीज, फ़्लॊपीज
व स्वस्त दरात नारळ मिळतील🔸

🔸इतरांनी वाहने लावू नयेत
लावल्यास हवा सोडून दिली जाईल🔸

🔸इतरांना आपल्यामुळे त्रास झाला तर
आपल्यालाही इतरांमुळे त्रास होऊ शकतो 🔸

🔸आम्ही शाकाहारी आहोत,
पण आमचा कुत्रा शाकाहारी नाही.🔸

🔸आम्ही खाद्यपदार्थांचे पैसे आकारतो
जागेचे भाडे नाही🔸

🔸आम्ही ऊपवासाचे पदार्थ
वेगळ्या तव्यावर करतो🔸

पुणेरी पाट्या घरासाठी

🔸आम्ही आमच्या वस्तू विकत आणतो
कृपया उधार मागू नये🔸

🔸आमच्याकडे सर्व भाषेतील
झेरॉक्स काढून मिळतील🔸

🔸आमच्या मुलाचे लग्न आता ठरले आहे ,
कृपया स्थळे आणू नयेत 🔸

🔸आपल्यामुळे इतरांना त्रास झाला तर इतरांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो🔸

🔸आजचे ताजे पदार्थ: भजी व मिसळ
मुळव्याधीचे औषध मिळेल🔸

🔸आज सगळ्या पुणेरी Ladies उपवास करणार, वडाला फेर्या मारणार आणी म्हणणार
वड़ापाव…!! वड़ापाव… !!🔸

🔸अरे मी गाढव आहे
गेटासमोर लावतोय गाडी🔸

🔸अब कि बार
कुणाचेही असो सरकार
पण बेल वाजवू नका १ ते ४
इथे दुपारी झोपतो मतदार🔸

🔸अनोळखी वस्तू दिसल्यास
स्पर्ष करू नये(व्यक्तींसकट)🔸

🔸”येथुन वाकून पाहू नये.
वाकून पहातांना पडल्यास
व्यवस्थापन जबाबदार नसेल
व अशा व्यक्तिस नियमांचा
भंग केल्याबद्दल ताबडतोब
अटक करण्यात येईल.”🔸

🔸”दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र”:
-डेअरी!🔸

🔸”आमचे येथे सायकलचे टायर
पंक्चर काढून मिळेल
स्पोक्स बसवून मिळतील ,
मुळव्याधीवरचे औषध मिळेल “🔸

पुणेरी पाट्यांची ही खुमासदार शृंखला आपल्याला दाखवते की संवाद कसा साधावा, हे पुणेकरांना माहीत आहे. शब्दांच्या खेळात दडलेला पुणेरी बुद्धीचा नमुना प्रत्येकाला भावतो. या पाट्यांमधील विनोद, उपदेश, आणि स्थानिक खासियत जपणं हेच आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे.

Leave a Comment