Navratri 2024: कडाकणी, देवीची ओटी, आणि कन्यापूजन कोणत्या माळेला करावे, जाणून घ्या सविस्तर माहिती

Navratri 2024: सध्या शारदीय नवरात्री 2024 उत्साहाने साजरी केली जात आहे, आणि या काळात देवीची कडाकणी, ओटी भरण्याचे नियम, आणि कन्यापूजन करण्याच्या पद्धतींविषयी अनेकांना प्रश्न पडतात. या लेखात आपण याच विषयांवर माहिती घेणार आहोत.

नवरात्रीत कडाकणी कधी बांधावी?

नवरात्रीच्या सातव्या, आठव्या, किंवा नवव्या दिवशी देवीला कडाकणी बांधण्याची परंपरा आहे. सप्तमी, अष्टमी, आणि नवमी या दिवशी कडाकणी बांधली जाते. काही जण सप्तमीला कडाकणी बांधतात, (Navratri 2024 Kadakani date and time) तर अनेकजण अष्टमी किंवा नवमीलाही बांधू शकतात. कडाकणीचा नैवेद्य दाखवताना ती पाच, सात, किंवा नऊ कडाकण्यांची माळ असते. देवीच्या पूजा विधीमध्ये कडाकणी बांधण्याचे विशेष महत्त्व आहे.

देवीची ओटी कधी भरावी?

अष्टमी किंवा नवमीला देवीची ओटी भरावी, अशी परंपरा आहे. ओटी भरताना यथाशक्तीनुसार साहित्य ठेवावे. ओटीमध्ये साडी, खणानारळ, किंवा तुम्हाला भावेल तसा प्रसाद असू शकतो. देवीच्या ओटी भरण्याची पद्धत ही आपल्या श्रद्धेनुसार केली जाते. काही जण देवीच्या मूळ पिठावर जाऊन ओटी भरतात, तर काही जण आपल्या घरातील देवीच्या घटस्थापनेच्या ठिकाणी ओटी भरतात.

कन्यापूजन कधी करावे?

नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करण्याचे महत्त्व आहे. कन्यांना देवीचे रूप मानून त्यांचे पूजन केले जाते. अनेक जण सप्तमीला कन्यापूजन करतात, परंतु अष्टमी किंवा नवमी या दिवशी (Kanya Pujan Navratri 2024 in Marathi) कन्यापूजन करण्यास प्राधान्य दिले जाते. ज्या कोणाला या नऊ दिवसांमध्ये कन्यापूजन करायचे असेल, त्यांनी एखाद्या दिवशीही ते करू शकतात.

पुरणपोळी आणि लाल भोपळ्याचा नैवेद्य

घट उठवण्याच्या दिवशी, म्हणजे नवमी किंवा दसरा, देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. याच दिवशी लाल भोपळ्याचा नैवेद्य देखील देवीला अर्पण केला जातो. काही ठिकाणी अष्टमीला भोपळ्याचे बलिदान दिले जाते आणि होम-हवन केले जाते.

नवरात्री 2024 मध्ये देवीची पूजा करताना या महत्त्वाच्या विधींचे पालन केल्यास देवीची कृपा आपल्यावर राहील. कडाकणी, ओटी, आणि कन्यापूजन या सर्व धार्मिक परंपरांना योग्य प्रकारे साजरे करून देवीचे आशीर्वाद मिळवता येतील

Leave a Comment