मित्र आणि मैत्रणींनो आज आपण मोबाईल मराठी निबंध / Mobile Essay In Marathi हा निबंध लेखन 100 शब्दांमध्ये करणार आहे.
मोबाईल वर मराठी निबंध | Mobile Essay In Marathi
[मुद्दे : मोबाईल विशेष लोकप्रिय – सर्वांच्या खिशात, हातात – लहानांपासून मोठ्यांपर्यंत – कोठेही, केव्हाही वापरता येणारा – वापरण्यास सोपा – दूरध्वनी- शिवाय इतर सोयी – गाणे ऐकणे, फोटो काढणे.]
मोबाईल आजकाल विशेष लोकप्रिय आहे. प्रत्येकाच्या खिशात किंवा कानाजवळ मोबाईलला स्थान! लहान मुलांनाही मोबाईलचे आकर्षण वाटते. त्यामुळे खेळण्यातही मोबाईल आला आहे. दूरध्वनीचेच काम मोबाईल करतो. पण मोबाईल हे फार पुढचे पाऊल आहे.
दूरध्वनीवर जी बंधने होती, ती मोबाईलने तोडून टाकली आहेत. त्याला ‘वायर’ लागत नाही, कोणत्याही जोडणीची त्याला आवश्यकता नसते. त्यामुळे जगातील कोणत्याही ठिकाणी व कोणत्याही वेळी मोबाईलचा उपयोग करता येतो. मोबाईल वापरण्यास सोपा असतो. त्यामुळे अशिक्षित लोकही तो वापरतात. फिरती कामे करणाऱ्यांना हा फार उपयोगी पडतो. एका जागी बसून कामे मिळवता येतात.
येण्या-जाण्यातील वेळेचा अपव्यय टळतो. काही मोबाईलमध्ये गाणी ऐकणे, फोटो काढणे अशा सोयीसुविधाही असतात. काही लोक त्याचा दुरुपयोगही करतात. मात्र अडचणीत संकटांच्या वेळी मोबाईलचा चांगला उपयोग होतो. म्हणून तो आपला मित्र आहे.
वरील निबंध हा खालील विषयांवर सुद्धा लिहू शकता
- मोबाईल निबंध मराठी / Mobile nibandh marathi
- मोबाईल वर मराठी निबंध /Phone nibandh marathi
- वैचारिक निबंध मोबाईल मराठी निबंध / Mobile var nibandh marathi