Maharana Pratap Speech In Marathi: महाराणा प्रताप यांच्यावर मराठी भाषण

Maharana Pratap Speech Marathi: महाराणा प्रताप हे भारतीय इतिहासातील शौर्याचे प्रतीक आणि स्वाभिमानाचे प्रतिरूप होते. राजस्थानच्या माळरानावर या वीर राजाने जनतेसाठी राज्य निर्माण करण्याचे महान कार्य केले. राजपूतांचा स्वाभिमान आणि परकीय सत्तांच्या विरोधातील त्यांचा संघर्ष आजही आदर्श आहे. या लेखामध्ये शौर्याचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांच्या वर भाषण लिहिलेले आहे.

Maharana Pratap Speech In Marathi

राजस्थानच्या माळराना वरती ज्या महान आणि शूर राजाने सर्वसामान्य जनतेसाठी ज्यांनी राज्य निर्माण करण्याचे काम केले त्याच महान राजांचे नाव महाराणा प्रताप होय. ९ मे १५४० रोजी राजस्थानातील कुंभालगड येथे शिसोदया राजपूत कुलात झाला. महाराणा प्रताप यांचे वडील उदयसिंह हे एक कर्तबगार पुरुष. अकबराने ज्यावेळी राजा उदयसिंह यांचा पराभव केला.

त्यापैकी ५-६ वर्षांने राजपूत वंशातील मात्तबदार सरदार एकत्र येऊन राणा प्रताप यांची १५७२ रोजी मेवाडच्या सिंहासनावरती बसवले आणि आपली सत्ता स्थापन केली. संपूर्ण मेवाडवरती अकबराची सत्ता होती. आजूबाजूचा सर्व प्रदेश हा अकबराच्या अधिपत्याखाली येत होता.

अवती भोवतीचे सर्व राजे सरदार अकबराचे वर्चस्व (मांडलिकत्व) मान्य करत होते पण महाराणा प्रताप त्यांच्या समवेत असणारे स्वाभिमानी, निष्ठावंत व्यक्ती मात्र स्वीकारण्यास तयार नव्हते. खडतर प्रवासातून, प्रचंड कष्टातून आपल्या व्यापक कल्पनेतून महाराणा प्रताप यांनी आपल्या राज्याची स्थापना केली.

अकबराचा सामना करायचा असेल तर सर्व रजपूतांना छोट्या-मोठ्या राजांना संघटित केले पाहिजे आणि नंतर अकबरावरती आक्रमण करणे हे चित्र डोळ्यासमोर ठेवून महाराणा प्रतापांनी आपली वाटचाल ही सुरू ठेवली. यासाठी अरवली पर्वताच्या शेजारी आपल्या सैन्याची आखणी, बांधणी एकत्र केली.

अकबराने महाराणा प्रतापाचा बंदोबस्त करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. (Maharana Pratap Marathi Speech For Students) हळदीघाटच्या लढाईमध्ये १५७६ भिल्ल, राजपूत वेगवेगळ्या समूहातील प्रादेशिक अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना एकत्र केले. त्यांनी अकबराच्या सैन्याला पराभूत केले.

सततच्या अकबराच्या आक्रमणाला न घाबरता महाराणा प्रतापांनी आलेले आक्रमण परतवून लावण्यासाठी मोठ्या धाडसाने शौर्याने तोंड दिले. ज्या कालखंडामध्ये अकबराच्या विरोधात लढण्याचे धाडस आपल्या देशामध्ये नव्हते त्या कालाखंडामध्ये अकबराचा प्रतिकार करण्यासाठी राणा प्रतापांनी प्रयत्न केले.

राणा प्रतापांचा पराभव करण्यासाठी दस्तूरखुद्द अकबराने प्रयत्न केला होता. पण यास न जुमानता अकबराचा पराभव केला. १५८४ साली चित्तोड, उदयपूर हा प्रदेश मोठा केला. महाराणा प्रतापांनी आपली सत्ता प्रस्थापित करून ओसाड भागामध्ये नंदनवन केले. जखमी सैनिकांची सेवा केली.

आपापसात लढणाऱ्या आणि विखुरल्या गेलेल्या राजपूत सरदारांना संघटित केले. आपले स्वत:चे राज्य सक्षम करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न केले. १५९७ ला अशा या महान राजाचे निधन झाले. स्वाभिमानी राजा म्हणून भारतीय इतिहासामध्ये महाराणा प्रताप यांचा आदराने उल्लेख केला जातो.

परकीय सत्ता यांच्या गुलामगिरीतून मुक्त घेण्यासाठी एक भूमिपुत्राने उभा केलेला लढा राणा प्रतापाच्या कार्यातून पाहावयास मिळतो. शत्रूचा पराभव करण्यासाठी आपल्याकडेही कुशल सैन्य, शस्त्रास्त्रे असावीत हीच भूमिका महाराणा प्रतापांची होती. याच त्यांच्या कार्यामुळे लढवय्या व पराक्रमी वृत्तीचे एक योद्धा असा आदराने उल्लेख केला जातो.

निष्कर्ष

महाराणा प्रताप यांनी स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी (महाराणा प्रताप यांच्या वर मराठीत भाषण लेखन) आणि आपल्या मातीसाठी अकबरा सारख्या बलाढ्य शत्रूशी लढा दिला. त्यांचे जीवन हे देशभक्ती आणि शौर्याचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या कार्यामुळे आजही त्यांना भारतातील सर्वात आदरणीय आणि वीर योद्ध्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते.

Leave a Comment