आषाढी वारी 2025 वेळापत्रक जाहीर: संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान कधी?

आषाढी वारी २०२५– महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक परंपरांपैकी एक असलेल्या आषाढी वारीचे 2025 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदा संत तुकाराम महाराज यांची पालखी 18 जून रोजी देहूतून प्रस्थान करणार असून, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जून रोजी आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. लाखो वारकरी “विठ्ठल विठ्ठल”चा गजर करत चालत पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 वेळापत्रक

दिनांकप्रवास / मुक्कामविशेष कार्यक्रम
१९ जूनआळंदी – प्रस्थानपालखी सोहळ्याचा प्रारंभ
२० जूनआळंदी ते पुणे
२१ जूनपुणे मुक्काम
२२ जूनपुणे ते सासवड
२३ जूनसासवड मुक्काम
२४ जूनसासवड ते जेजुरी
२५ जूनजेजुरी ते वाल्हे
२६ जूनवाल्हे ते लोणंदमाऊलींचे निरास्मान
२७ जूनलोणंद ते तरडगाव
२८ जूनतरडगाव ते फलटण
२९ जूनफलटण ते बरड
३० जूनबरड ते नातेपुतेबरड येथे गोल रिंगण
१ जुलैनातेपुते ते माळशिरससदाशिवनगर येथे गोल रिंगण
२ जुलैमाळशिरस ते वेळापूरखुडूस येथे गोल रिंगण
३ जुलैवेळापूर ते भंडी शेगावठाकूर बुवा समाधी गोल रिंगण व बंधूभेट
४ जुलैभंडी शेगाव ते वाखरीबाजीराव विहीर येथे उभे रिंगण
५ जुलैवाखरी ते पंढरपूरवाखरी येथे गोल रिंगण
६ जुलैपंढरपूर मुक्कामदेवशयनी आषाढी एकादशी, चंद्रभागा स्नान
१० जुलैपंढरपूर ते आळंदी (परतीचा प्रवास सुरू)

टीप: वारी मार्गात बदल किंवा स्थानिक परंपरांनुसार कार्यक्रमात फेरबदल होऊ शकतात. अधिकृत माहिती आणि अपडेटसाठी स्थानिक पालखी समितीच्या सूचना तपासाव्यात.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2025 वेळापत्रक

दिनांकप्रवास / मुक्कामविशेष उल्लेख
१८ जूनदेहू – प्रस्थान, इनामदार वाडा मुक्कामप्रारंभिक सोहळा
१९ जूनदेहू – निगडी – आकुर्डी, आकुर्डी मुक्काम
२० जूनआकुर्डी – पुणे, नाना पेठ मुक्काम
२१ जूनपुणे, निवडुंगा विठ्ठल मंदिर मुक्काम
२२ जूनपुणे – हडपसर – लोणी काळभोर मुक्काम
२३ जूनलोणी काळभोर – यवत मुक्काम
२४ जूनयवत – वरवंड – चौफुला मुक्काम
२५ जूनवरवंड – उंडवडी गवळ्याची मुक्काम
२६ जूनउंडवडी गवळ्याची – बारामती मुक्काम
२७ जूनबारामती – काटेवाडी – सणसर पालखीतळ मुक्कामकाटेवाडी येथे मेंढी-बकरी रिंगण
२८ जूनसणसर – बेलवाडी – निमगाव केतकी मुक्कामबेलवाडी येथे पहिलं गोल रिंगण
२९ जूननिमगाव केतकी – इंदापूर मुक्कामइंदापूर येथे गोल रिंगण
३० जूनइंदापूर – सराटी पालखीतळ मुक्काम
१ जुलैसराटी – अकलूज मुक्कामअकलूज येथे निरास्मान व गोल रिंगण
२ जुलैअकलूज – बोरगाव मुक्काममाळीनगर येथे उभं रिंगण
३ जुलैबोरगाव – पिराची कुरोली मुक्काम
४ जुलैपिराची कुरोली – वाखरी पालखीतळ मुक्कामबाजीराव विहीर येथे उभं रिंगण
५ जुलैवाखरी – पंढरपूर मुक्कामवाखरी येथे उभं रिंगण
६ जुलैपंढरपूर – एकादशीनगरप्रदक्षिणा व चंद्रभागा स्नान
१० जुलैपरतीचा प्रवास – पंढरपूर ते देहू

टीप: पालखी मार्ग व वेळा स्थानिक परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात. अधिकृत घोषणेसाठी स्थानिक पालखी समितीच्या सूचनांकडे लक्ष द्या.

आषाढी वारी: महाराष्ट्राच्या श्रद्धेचा जीवंत उत्सव

वारकरी संप्रदायाची वारी ही केवळ यात्रा नाही, तर भक्ती, सामूहिक एकात्मता आणि सांस्कृतिक वारशाचा एक जिवंत अनुभव आहे. “विठ्ठल विठ्ठल” च्या गजरात होणारी ही वारी प्रत्येक वर्षी महाराष्ट्राच्या हृदयातून पंढरपूरच्या दिशेने निघते. रिंगण, भजन, दिंडी, अभंग आणि आषाढी एकादशीला चंद्रभागा स्नान – या सर्व गोष्टी वारकऱ्यांच्या भक्तीला आणखी उंचीवर नेतात.

आषाढी वारी 2025 ची महत्त्वाची दिनांक

दिनांककार्यक्रम
18 जूनसंत तुकाराम महाराज पालखीचे देहूतून प्रस्थान
19 जूनसंत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आलंदीहून प्रस्थान
6 जुलैआषाढी एकादशी – चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठल दर्शन
10 जुलैदोन्ही पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू

आषाढी वारी 2025 मध्ये लाखो भक्त सहभागी होणार असून, ही यात्रा पुन्हा एकदा भक्तीचा जागर बनणार आहे. यंदाची आषाढी एकादशी 6 जुलै 2025 रोजी आहे, त्यामुळे त्या दिवशी पंढरपूरमध्ये अत्यंत मोठी गर्दी अपेक्षित आहे. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आणि चंद्रभागा स्नानासाठी वारकरी मोठ्या उत्साहात येतात.