Political News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक, जागा वाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर

मुंबई, ७ ऑक्टोबर: राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांकडून जागा वाटपाबाबत चर्चेचे सत्र सुरू असून, महाविकास आघाडीने याबाबत महत्त्वाची पावले उचलली आहेत. आज मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या (Latest Marathi News) नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील तीन जागांवर चर्चा झाली.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दसऱ्याला जागा वाटपाची पहिली यादी जाहीर होणार आहे. पटोले म्हणाले, “आज झालेल्या चर्चेत सकारात्मकता दिसून आली असून, उद्यापर्यंत याबाबत अधिक स्पष्टता मिळेल. आमचं एकमेव ध्येय महाराष्ट्रातील सध्याचं शिवद्रोही आणि गुजरात धार्जणी सरकार सत्तेवरून खाली खेचण्याचं आहे.”

महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जागा वाटपाचा तिढा सुटत असल्याचे संकेत मिळत असून, दसऱ्याला पहिली यादी मोठ्या संख्येने जाहीर केली जाईल, अशी अपेक्षा आहे

Leave a Comment