Indira Gandhi Marathi Speech: भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्या प्रखर वक्तृत्व आणि अढळ निर्धारासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांची भाषणे सशक्त, आत्मनिर्भर भारताच्या त्यांच्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब होती. राष्ट्रीय महत्त्वाच्या, परराष्ट्र धोरणाच्या किंवा समाजकल्याणाच्या मुद्दय़ांवर त्यांचे शब्द लक्षावधी लोकांच्या पसंतीस उतरले आणि त्यांनी देशाच्या राजकीय पटलावर कायमस्वरूपी प्रभाव टाकला.
या ब्लॉगमध्ये, आम्ही इंदिरा गांधी यांच्यावर भाषण, ज्यात त्यांचे नेतृत्व, लवचिकता आणि भारताच्या भविष्यासाठी त्यांची दृष्टी दर्शविली गेली आहे.
First Female Prime Minister `Speech In Marathi
भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये अग्रक्रमाने भाग घेणारी एक धाडसी युवती म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते. आपल्या लहानपणीच्या जीवनामध्ये आपले वडील आणि आजोबा तुरुंगात असताना देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये बालपणामध्ये वानरसेना स्थापन करून ज्या युवतीने हातभार लावला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथम ज्या महिलेला पंतप्रधान होण्याचा योग आला त्याच महिलेचे नाव आहे इंदिरा गांधी.
इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. इंदिराजींचे वडील जवाहरलाल आई कमलादेवी यांची लाडकी व प्रेमळ मुलगी म्हणून इंदिराजींचा गौरव केला जातो. लहानपणापासूनच देशसेवा आणि जनसेवा यांची आवड असणारी इंदिरा गांधी यांच्या विविध पैलूंचे दर्शन त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टीतून प्रकट होते. शांतिनिकेतनमध्ये शिकताना त्यांची विशेष जडण-घडण झाली.
विदेशामधून आपल्या मुलीने शिक्षण घ्यावे ही पालकांची इच्छा. इंदिराजींनी विदेशामध्ये शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना नेहरूजींनी इंदिराजींना पत्र लिहिले. नेहरूजींचा बराच कालखंड व्यस्त स्वरूपाचा असे. ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळ तेवत ठेवण्यासाठी नेहरू देशभर भ्रमंती करत असत.
अशा कालखंडामध्ये नेहरू स्वत:च्या मुलीची विचारपूस करण्यासाठी सतत पत्रे लिहीत असत. या पत्राच्या माध्यमातून मुलीची विचारपूस, जडणघडणीसाठी आवश्यक असणारे संस्कार, मार्गदर्शन नेहरू सदैव करत. याच पत्रांना उत्तर हे इंदिराजींचे आदरपूर्वक पालन करणारे असत. आजही ही पत्रे एक आदर्श पत्रे म्हणून पाहावयास
मिळतात.
विदेशातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर देशातल्या स्वातंत्र चळवळीचे वारे वाहत असताना इंदिराजींनी स्वतःला झोकून दिले. थोरामोठ्या वक्त्यांची, स्वातंत्र्यवीरांची भाषणे इंदिराजींच्या कानी पडू लागली. घरातील स्वातंत्र्य चळवळीचे वातावरण व अवती-भवतीच्या परिस्थितीमुळे इंदिराजी स्वातंत्र्यलढ्यात
सहभागी झाल्या.
१९३७ साली ज्यावेळी देशामध्ये सार्वजनिक निवडणुका झाल्या. त्यावेळी खेड्यापाड्यामध्ये इंदिराजींनी नेहरूंचा प्रचार केला. देशाच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये. इंदिराजी निवडणुकीच्या निमित्ताने फिरू लागल्या. प्रभावी वक्तृत्व, कुशल बुद्धिमत्ता याच्यामुळे इंदिराजी लोकांना आपल्याशा वाटू लागल्या. १९४२ साली ज्यावेळी देशामध्ये स्वतंत्र्य चळवळीचा जोर वाढू लागला.
त्याचवेळी इंदिरा गांधी छोडो भारतच्या चळवळीसाठी हिरिरीने भाग घेऊ लागल्या. वडील पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्या बरोबरीने देशभर फिरू लागल्या. सभा गाजवू लागल्या. लोकांना मंत्रमुग्ध करू लागल्या. याच इंदिराजी स्वतंत्र लढ्याच्या कारकिर्दीमध्ये सर्वसामान्य जनतेला आपल्याशा वाटू लागल्या.
१५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशाचे पंतप्रधान नेहरूजी देशाचे नेतृत्व करत होते. त्यावेळी नेहरूंना आपल्या वडिलांना सहकार्य करत. नेहरूंच्या अकाली निधनानंतर देशामध्ये लालबहाद्दूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात नभोवाणी मंत्री म्हणून काम करणाऱ्या इंदिराजी लोकप्रिय होत गेल्या. पुन्हा शास्त्रींच्या निधनानंतर देशाच्या पंतप्रधानपदी १९६६ रोजी इंदिराजींची निवड झाली. खऱ्या अर्थाने एका स्त्री शक्तीचा सन्मान झाला.
देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर पंडित नेहरूंची अलिप्ततावादी चळवळ, रशियाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध, १९७१ साली बांगलादेशाची निर्मिती, १४ प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण असे ऐतिहासिक निर्णय इंदिराजींनी घेतले. हे निर्णय घे असताना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. १९७७ कालखंडामध्ये पक्षाचा दारुण पराभव. आणीबाणीच्या कालखंडामध्ये तुरुंगवास भोगावा लागला. आघाड्यांचे जनता सरकार कोसळले आणि इंदिरा गांधी १९८० साली सरकार विजयी झाले.
इंदिराजींची सर्वांत लोकप्रिय योजना “गरिबी हटाव.” या योजनेच्या माध्यमातून घोषणा केली. देशाचे दारिद्र्य नष्ट करायचे असेल तर बेरोजगार हातांना काम दिलं पाहिजे. हे इंदिराजींनी ओळखून देशामध्ये वेगवेगळी धरणे, रस्ते, प्रकल्प यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू केली व यातून रोजगारांच्या संधी उपलब्ध केल्या. बेकारांना काम दिले. गरिबांच्या समस्या ओळखून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी अफाट कष्ट कणाऱ्या महिला म्हणून इंदिराजींचा गौरव केला जातो. जगातील ८२ हून अधिक देशांना भेट देणाऱ्या व्यक्ती आहेत.
इंदिराजींच्या कारकिर्दीमध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागांचा विकास करण्यासाठी योजना अंमलात आणल्या गेल्या. त्यांचे कठोर आणि धाडसी निर्णय हीच त्यांच्या कार्याची पद्धत होती. यामुळे विरोधकसुद्धा त्यांचा आदराने उल्लेख करत होते. संपूर्ण स्त्रीशक्तीचा सन्मान करणारी, सर्वांना सोबत घेऊन देशाचा विकास करणारे एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून इंदिराजींचा उल्लेख केला जातो.
१९८० साली त्यांचे चिरंजीव संजय गांधी यांचं निधन झालं. मुलांच्या मृत्यूनंतर इंदिराजी गहिवरल्या पण या दुःखातून स्वत:ला सावरले. त्यांनी देशसेवेचा वसा घेणाऱ्या इंदिराजींनी देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला. त्या देशभर जेव्हा दौरे करत.
तेव्हा इंदिराजी आपले वेगवेगळे अनुभव आपल्या भाषणातून प्रकट करत असत. आजोबा मोतीलाल नेहरू यांनी सांगितलेल्या शौर्याच्या कथा, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मनमिळावू स्वभाव व १९४२ च्या लढ्यामध्ये भोगलेला १३ महिने कारावास या गोष्टींचा इंदिराजी आपल्या भाषणामध्ये आवर्जून उल्लेख करत. यामुळे इंदिराजी सर्व लोकांच्या मध्ये
लोकप्रिय झाल्या.
सामान्य जनतेला इंदिराजी आपल्याशा वाटत होत्या. देशाच्या इतिहासामध्ये अफाट लोकप्रियता मिळालेली स्त्री म्हणून इंदिरा गांधी यांचा उल्लेख प्रामुख्याने होतो. हीच इंदिरा गांधींच्या कार्याची पोचपावती आहे. जगभरातील लोक इंदिराजींचा ‘इंडिया’ असा उल्लेख करत होते. देशामध्ये ज्यावेळी काँग्रेस पक्ष अडचणीत होता त्यावेळी पक्षाला सावरण्याचे कार्य इंदिराजींनी केले.
अशा या महान व्यक्तीचे निधन ३ नोव्हेंबर १९८४ रोजी झाले. इंदिराजींच्या मृत्यूनंतर आज त्यांच्याच कार्याचा आदर्श घेणाऱ्या हजारो स्त्रिया आपल्या देशामध्ये पाहावयास मिळतात. राजकारणाबरोबर समाजकारणाला महत्त्व देऊन लोकशिक्षणाबरोबर भारतीय शेती व शेतकऱ्यांचा कष्टकरी, श्रमजीवी वर्गांचा विकास करण्यासाठी इंदिराजींनी प्रयत्न केले आणि म्हणूनच इंदिराजींचा उल्लेख “तेजस्वी दुर्गा’ असाही करतात.
निष्कर्ष
इंदिरा गांधी यांची भाषणे त्यांच्या उल्लेखनीय नेतृत्वाची आणि भारताविषयीच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. त्यांचे शब्द पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देत आहेत, राष्ट्रीय एकता, प्रगती आणि सामाजिक न्यायाप्रती त्यांची बांधिलकी दर्शवितात. त्यांच्या वारशाकडे मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं की, त्यांचं सशक्त वक्तृत्व हे केवळ संदेश देण्यापुरतं नव्हतं, तर लाखो लोकांच्या मनात आशा आणि निर्धार निर्माण करण्यासाठी होतं. भारताच्या लोकशाही प्रवासात त्यांचा आवाज आजही गुंजतो आणि देशाचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असलेल्या सामर्थ्याची आणि धैर्याची आठवण करून देतो.