स्वातंत्र्यदिन वर निबंध मराठी | Independence Day Essay In Marathi Best 100 Words

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण स्वातंत्र्यदिन मराठी निबंध / Independence Day Essay In Marathi हा निबंध लेखन 100 शब्दांमध्ये  करणार आहे.

 स्वातंत्र्यदिन वर मराठी निबंध |  Independence Day Essay In Marathi

Independence Day Essay In Marathi

निबंधलेखन

वर्णनात्मक निबंध – भारताचा स्वतंत्र्यदिन

[मुद्दे : पंधरा ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन – १५.८.१९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला – स्वातंत्र्यलढा – अनेकांचे हौतात्म्य – ध्वजारोहण – ध्वजवंदन – प्रतिज्ञा.]

दरवर्षी पंधरा ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. कारण १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला. शंभरसव्वाशे वर्षांची गुलामगिरी दूर झाली. या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी खूप तीव्रतेने लढा दिला.

अनेक देशभक्त हुतात्मा झाले. प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्यासाठी आसुसला होता. म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्टला या मंगल क्षणाचे स्मरण केले जाते. दरवर्षी पंधरा ऑगस्टला ठिकठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. दिल्लीमध्ये सैनिकांचे संचलन केले जाते.

अनेक ठिकाणी देशभक्तिपर कार्यक्रम साजरे केले जातात. लोक घराघरांवर भारताचा राष्ट्रध्वज फडकवतात. मोठ्या कष्टाने भारताने स्वातंत्र्य मिळवले आहे. ते आपण टिकवले पाहिजे. तरच देशाची प्रगती होईल. म्हणून या दिवशी प्रत्येक भारतीय देशाच्या स्वातंत्र्यरक्षणाची प्रतिज्ञा घेतो.

वरील निबंध हा खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • स्वातंत्र्यदिन निबंध मराठी / Swatantrya din nibandh marathi
  • स्वातंत्र्यदिन वर मराठी निबंध  /15 august nibandh marathi
  • भारत स्वातंत्र्यदिन मराठी निबंध /  15 august swatantrya din nibandh marathi 
मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा स्वातंत्र्यदिन वर मराठी निबंध कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद