या पोस्ट मध्ये होळी मुहूर्त, होळी कशी साजरी करावी, होळी पूजा कशी करावी, होळीचा विधी होळीची माहिती दाखवा,होळीची माहिती मराठी, होळीचा इतिहास, होळी सणाची माहिती मराठी,होळीची माहिती मराठी, होळीची माहिती मराठी मध्ये, होळीची माहिती सांगा, होळीची माहिती लिहून, होळीची माहिती मराठी मधून, होळीची माहिती पाहिजे, होळी माहिती मराठी, होळी माहिती मराठीत, होळी माहिती दाखवा, होळीची माहिती, होळीची माहिती मराठी,रंगपंचमी माहिती द्या,रंगपंचमी माहिती सांगा,रंगपंचमी माहिती मराठी मध्ये,रंगपंचमी निबंध मराठी, बघणार आहोत.
होळी आणि रंगपंचमी सविस्तर माहिती
holi muhurat / holi muhurt in marathi
- holi shubh muhurat : 06:36:38 PM ते 08:56:23PM
- होळी दहन कालावधी : 2 तास 19 मिनिटे
- भद्र पुच्छा : 10:27:50AM ते 11:30:34AM
- भद्र मुखा : 11:30:34AM ते 01:15:08PM
हिंदू पंचांगाच्या अनुसार होळीचे पर्व चैत्रमहिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेला साजरे केले जाते. जर प्रतिपदा दोन दिवस असली तरपहिल्या दिवशी धूलिवंदन साजरे केले जाते ह्या सणाला वसंत ऋतूचे आगमन करण्यासाठीसाजरे केले जाते. वसंत ऋतुमध्ये प्रकृतीत पसरलेल्या रंगांच्या छटेने रंगांना खेळून वसंतऋतू होळीच्या रूपात दर्शवले जाते. विशेषतः उत्तर भारतात होळीच्या दिवशी रंग खेळाला जातो
holi puja sahitya in marathi / sahitya holi
- नारळ
- तांदळाचा अक्षदा
- शेणाच्या गौऱ्या
- हळदी कुंकू
- येरनड्याची फांदी
- ऊस
- उदबत्ती
- पूरण पोळीचा नैवेध्य
- नाणे
holi puja kashi karavi / holi chi puja kashi karavi / होळीचा विधी
- कोणत्याही वाळलेल्या लाकडाची फांदी उभी करावी
- त्यानंतर त्याच्या कडेने शेणाच्या गौऱ्या लावाव्यात नंतर त्या होळीच्या चहुबाजूने लोक उभे राहतात
- त्यानंतर मुहूर्तानुसार होळीचे पूजन केले जाते.
- वेगवेगळ्या क्षेत्रात आणि समाजात वेगवेगळ्या पध्दतीने होळीची पूजा केली जाते.
- होळीची पारंपारीक पूजा पध्दतीने पूजा करायला हवी.
- होळी पूजन करण्याच्या वेळेस खालील मंत्राचे उच्चारण करायला हवे
होळी पूजन मंत्र / holi pujan mantra
अहकूटा भयत्रस्तैः कृता त्वं होलि बालिशैः ।
अतस्वां पूजयिष्यामि भूति-भूति प्रदायिनीम् ॥
- पूजनानंतर होळी पेटववावी
- दहनानंतर गव्हाच्या ओंब्या त्यात भाजल्या जातात
- होळी सण नवीन आलेल्या पिकाच्या आनंदात साजरा करतात
- होळी दहन केल्यानंतर जी राख राहते त्याला भस्म म्हणतात ते भस्म शरीरावर लावतात
- ते भस्म म्हणजे राख लावताना खालील मंत्राचे उच्चारण करावे…
वंदितासि सुरेन्द्रेण ब्रम्हणा शंकरेण च ।
अतस्त्वं पाहि माँ देवी! भूति भूतिप्रदा भव ॥
रंगपंचमी आणि धूळवड / holi ki information in marathi
महाराष्ट्रामध्ये शिमगाच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चार करून जाळली जातात आणि पेटलेल्या होळीच्याभोवती लोक ‘बोंबा’ मारत प्रदक्षिणा घालत असतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेध्य दाखवतात. महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. होळी झाल्यानंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा करतात .होळी झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन साजरा केला जातो. याला धुळवड म्हणतात. त्या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जातात. एकमेकांना गुलाल लावत रंगांची उधळण करतात, सर्व एकत्र येतात, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहतात.
history of holi in marathi / history of holi festival in marathi
होळीचे वर्णन खूप आधीपासून आपल्याला पाहायला मिळते. प्राचीन विजयनगरसाम्राज्याची राजधानी हम्पी मध्ये सोळाव्याशतकाचे चित्र मिळाले आहे. ज्यामध्ये होळीच्यसणाला उकेरा केले आहे. असे ही विंध्य पर्वताच्या जवळ रामगढ मध्ये भेटलेल्या इसा कडून ३०० वर्ष जुने अभिलेखात ही याचा उल्लेख मिळतो.
होळी हा भारतात, विशेषतः उत्तर भारतात उत्साहाने साजरा होणारा रंगांचा एक सण. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, धुळवड, होळी पौर्णिमा, धूलिवंदन व रंगपंचमी अशी नावे दिलेले आहेत.
होळीचे विविध प्रांतातील नावे / holi information in marathi
होळी या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी” “शिमगा“, “हुताशनी महोत्सव“, फाग, फागुन “दोलायात्रा“, “कामदहन” अशा वेगवेगळ्या नावे दिले आहेत. कोकणामध्ये होळीला शिमगो असे म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या सणाला “फाल्गुनोत्सव”,आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनाला “वसंतागमनोत्सव” किंवा “वसंतोत्सव” असे म्हणतात. देशीनाममाला ह्या ग्रंथामध्ये हेमचंद्र यांनी या सणाला सुग्रीष्मक असे नाव दिलेले आहे. त्यातूनच ‘शिमगा’ हे नाव तयार झाले असावे असे मानले जात आहे.
शेतकरी संस्कृतीतील होळीचे महत्त्व / Importance of Holi
भारतामधील शेतकरी वर्गात होळी या सणाला खास महत्त्व दिले जाते. पौराणिक इतिहास पहिला तर या सणाचे आणि कृष्ण बलराम यांचे नाते दिसते. होळीच्या निमित्ताने दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा केली जाते. त्या दिवशी हाताशी आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना केली जाते. होळीनंतर दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची परंपरा आहे. होळीच्या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हेच त्यामागचे कारण असू शकतेय. नवीन आळलेल पीक अग्नि देवतेला समर्पित करण्याची परंपरा आहे.
होळी या सणाची आख्यायिका / holi festival in marathi
लहान लहान मुलांना पीडा देणाऱ्या “होलिका”, “ढुंढा”, “पुतना” ह्यांसारख्या राक्षसांच्या दहनाच्या कथांमध्ये ह्या सणाला परंपरेचा शोध लोक घेतात. (पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचे भक्त असलेल्या प्रल्हाद याला मारण्यासाठी हिरण्यक शिपूने लावलेल्या होलिका देवतेचा श्री विष्णू देवाने वध केलेला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाहीत, पण प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला गेला व होलिकेचे दहन झाले अशी ही आख्यायिका प्रचलित आहे. अशाचप्रकारे, हिंदूंच्या इतर सणासारखे होलिका दहन हे देखील वाईटावर चांगलयांच्या विजयाचे चांगले प्रतीक आहे आणि वाईट गोष्टींवर विजय मिळवणे ही या होळी सणाची व्याख्या आहे
कोकणामधील शिमगोत्सव / holi information in marathi in short
कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात मानला जात असतो . फाल्गुन महिन्यात येणारा हा शिमगा उत्सव शेतकऱ्यांच्या निवांत काळामध्ये येतो.शेतीची कामे ही संपलेली असतात. शेतीची भाजवणी करून ठेवली असते. मग पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे ६-७ जून पर्यंत {सूर्य रोहिणी या नक्षत्रात यायचा दिवस असतो}विश्रांती घेण्याचा काळ असतो. ह्यामुळे हा काळ कोकणात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरतात कोकणात विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक प्रमाणात साजरा केला जातो . तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस साजरा केला जातो . परंपरेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळी सणाचा प्रमुख दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम करतात, तसेच काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम करतात यालाच ‘भद्रेचा होम ‘ असे म्हटले जाते.
फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी करतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरवल्या जातात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरवल्या जातात आणि पौर्णिमेला होळी साजरी केली जाते . याला ‘होम’ लागणे असे बोलले जाते. काही गावांमध्ये होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरवतात अशी परंपरा आहे .
पौर्णिमेला रात्री उशिरा होम पेटवला जातो. काही ठिकाणी त्यावर जिवंत कोंबड्या लावल्या जातात. त्यावेळी तो होम हा रात्री बाराच्या अगोदर लावला जातो. या लावलेल्या कोंबड्याचा प्रसाद घरी नेतात आणि त्याचा प्रसाद घेतला जातो, यालाच तिखटाचा सण असे म्हणतात. बऱ्याच ठिकाणी रात्री बारा पासून ते पहाटे पाच पर्यन्त या वेळात होम लावला जातो , यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, याला गोडाचा सण असे म्हणतात.
ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिराच्यासमोर पहिला होम लावण्याचा मान आहे. हा मानाचा होम झाल्यावर त्यातील झालेला निखारा किंवा राख घेऊन जातात व त्यावर गावातील ठिकठिकाणी होळी पेटवली जाते.
holi information in marathi essay / holi festival history in marathi
कोकणात चिपळूण तालुक्यातिल सावर्डे येथे होल्टा होम या प्रकारचा होम केला जातो. होळीच्या-होमाच्या अगोदरच्या दिवशी, नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशात मानकरी नावाचा प्रकार खेळला जातो. श्री केदारनाथ देवस्थानचे मानकरी हातामध्ये जळती लाकडे घेऊन, उघडबंब आणि पायातिल चप्पल न घालता मैदानामध्ये दोन बाजूला उभे असतात . दोन बाजूला उभे असलेले मानकरी एकमेकावर हातातील जळती लाकडे फेकतात. हा खेळ काही वेळ खेळला जात असतो. या खेळामध्ये कोणालाहकी इजा होत नाही हा याला विशेष म्हटले जाते.
कोकणात आसूद येथे होळीच्या सणाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लुटतात. होळी अतिशय सुंदररीत्या सजवतात. रांगोळ्या काढतात. पताका लावतात. फुलांची सजावट करतात.. होळीची पूजा करून होळी भोवती फेर धरून लोकगीते म्हणतात. होळीच्या दिवशी बाहुला बाहुलीचे लग्न लावण्याची प्रथा आहे. त्यात संपूर्ण गाव सामील होते. वरात, मंगलाष्टके, आहेर, अल्पोपहार अशी धमाल असते.
किनाऱ्यावरील बंदरांवर होणारा शिमगा
कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतका आणि शतके राहणारी कोळी बांधव आणि त्यांची कुटुंबे शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या होड्यांची पूजा करतात. मासेमारीसाठी पुरुष समुद्रात जातात पण होळीच्या दुसऱ्या दिवशी मात्र होडीवर जायचा मान घरच्या स्त्रियांना दिला जातो. यामुळे स्त्रियांसाठी हा विशेष उत्सवाचा दिवस आहे. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कुटुंबीय आपल्या होडीवर जातात. काहीजण होडी समुद्रामध्ये नांगरून पूजा करतात आणि काहीजण समुद्रामध्ये होडीतून फेरी मारत होडीत पूजा करतात. कलश स्थापन करून , घरातल्या देवीच्या टाकाचे पूजन होडीवर मध्यभागी केले जाते. या नंतर पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण अशाप्रकारे आनंदाचा हा उत्सव साजरा केला जातो .
होळीची विविध गावातील प्रथा / holi festival story in marathi
रत्नागिरीमधील ओठी-नवेठ गावातील शिमग्यामध्ये ‘होलदेव’ साजरा करतात . नवलाई देवीच्या देवळात एक ५० ते ६० किलो चा एक दगड आहे. याला होलदेव असे म्हणतात. ह्याची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे असे मानले जातात. भद्रेचा होम ज्यावेळेस पेटविला जातो त्यावेळेस गावातील मानकरी आणि विशेष करून नवविवाहित तरुण हे होलदेव उचलतात आणि होळीभोवती एक प्रदक्षिणा मारतात.
देवळे-महाल ह्या गावात ग्रामदेवता काळेश्वरी, चाफवली, मेघी, दाभोळे, कनकाडी, कारंजारी, या सर्व ग्रामदेवतांच्या पालख्या एकत्र येऊन उत्साहाने नाचवितात.
कुडाळ तालुक्यामधील शिवापूर गावातील गडकऱ्यांची ही होळी- छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जोपासणारे हे गाव आहे . शिवापूर गाव हे शिवकालातिल नांदते गाव होते . मनोहर मनसंतोष किल्ल्यावर 300 गडकऱ्यांची वस्ती होती. स्वराज्यातील मावळे हे जे मर्दानी खेळ त्यावेळेस खेळायचे ती परंपरा या गावात आजही जोपासतात. अग्नितून पळणे, नारळ जिंकणे या स्पर्धा शिमगा उत्सवात भरवतात . होळीच्या दिवसात ‘जती’ च्या रूपात गायनाचा कार्यक्रम घेतला जातो. धूलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण्याची परंपरा आजही आहे.
होळीची मराठी गाणी / holi song marathi / marathi holi song
होळी हा सण कवींच्या व गायकांच्या आवडीचा. होळीची अनेक मराठी आणि हिंदी गाणे आणि ठुमऱ्या आहेत. त्यांपैकी काही गाणी
1. आला होळीचा सण लई भारी (चित्रपट – लई भारी, गीतकार – गुरू ठाकुर / संगीतकार – अजय-अतुल / गायक/गायिका – स्वप्निल बांदोडकर, योगिता गोडबोले)
2. शिमगा उगवला होळी पुनवचा होळी पुनवचा सण (गायक/गायिका – सुरेश वाडकर, साधना सरगम)
3. होळी रे होळी (चित्रपट – लई झकास)
रंगपंचमी माहिती मराठी / Rangpanchami information in marathi
रंगपंचमी हा एक सण आहे. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा करतात. धूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या या दिवशी 5 दिवस पूर्ण होत. रंगांचा सण म्हणजे रंगपंचमी होय रंगपंचमी च्या दिवशी एकमेकांला वेगवेगळे रंग लावून आनंद साजरा करतात.
रंगपंचमीचा इतिहास / rangpanchami in marathi
द्वारपायुगातील गोकुळात बाल/कुमार कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवत असे व उन्हाची तलखी कमी करायचे. ती हीच परंपरा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालत आहे. मध्ययुगात संस्थानिक राजे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करत होते.
रंगपंचमीचे महत्त्व / Importance of Rangpanchami
रंगपंचमी हा सण वसंतऋतूशी निगडित महत्त्वाचा असा सण. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच रंगपंचमी हा सण साजरा करतात. उन्हाचा तडाखा कमी होण्यासाठी आणि थंडावा मिळण्यासाठी साठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची परंपरा आहे.
रंगपंचमीचे स्वरूप / रंगपंचमी माहिती मराठी
देशाच्या काही भागात रंगपंचमी या लोकप्रिय सणाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व दिले जाते. वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात रंगोणचमी उत्सवाला सुरुवात होते. या रंगपंचमीच्या दिवशी होळीशी संबंधित लोकगीते गातात. व्रज प्रांतात कृष्ण आणि बलराम या होळीच्या सणाचा आनंद घेत होते असे मानले जाते, तसेच उत्तर प्रदेशात होळीचा आनंद घेण्याला धार्मिक महत्त्वही दिले आहे.
रंगपंचमीची सद्यस्थिती / रंगपंचमी 2021
रासायनिक रंगांचे दूष्परिणाम पाहता नैसर्गिक रंग वापरून हा सण साजरा करण्याचे प्रमाण अलीकडे वाढलेले दिसून येते. या दिवशी लोक रंग खेळून आनंद घेतात.
फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ,हळद, बीट या अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार करतात.
आम्हाला आशा आहे की तुम्हाला rangpanchami 2021, holi ki puja kashi karavi, होळीचे महत्त्व
रंगपंचमी माहिती दाखवा, रंगपंचमी माहिती पाठवा, होळी विषयी माहिती, होळी सणाची माहिती मराठी, होळी सणाची माहिती मराठी निबंध, होळी सणाची माहिती मराठी मध्ये, होळी सणाची माहिती सांगा, होळीच्या सणाची माहिती सांगा, होळी या सणाची माहिती नक्कीच आवडली असेल आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद,