Dr Babasaheb Ambedkar Speech Marathi: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ मानले जातात. त्यांचे जीवन म्हणजे संघर्ष, शिक्षण, आणि समाजाच्या उत्थानासाठी अविरत प्रयत्न यांचे प्रतीक आहे. अस्पृश्यता आणि जातिभेदा विरोधात लढा देत त्यांनी समाजातील वंचित आणि शोषित वर्गासाठी कार्य केले. त्यांच्या विचारांनी आणि क्रांतिकारक चळवळींनी भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाला नवा आकार दिला. बाबासाहेबांचे योगदान आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. या लेखात आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी भाषण मराठीत दिले आहे.
Dr Babasaheb Ambedkar Speech In Marathi
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतीय लोकशाहीची कल्पना ज्यांच्या समग्र विचारातून साकारली त्या महापुरुषाचे आपल्या सर्वांना स्मरण होते. १४ एप्रिल, १८९१ साली मध्यप्रदेशातील महू या ठिकाणी क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला.
बाबासाहेब यांचे वडील रामजी आंबेडकर हे लष्करामध्ये सुभेदार या पदावरती होते. प्रतिकूल परिस्थितीतून आणि तत्कालीन समाज व्यवस्थेला छेद देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे शिक्षण भारतात पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी विदेशात गेले. बी. ए. झाल्यानंतर बाबासाहेब विदेशामध्ये शिक्षणासाठी १९१३ साली महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेब यांची बुद्धिमता पाहून त्यांना शिष्यवृत्ती दिली. ते विदेशामध्ये (कोलंबिया विद्यापीठ) गेले. १९१६ मध्ये पीएच.डी पदवी प्राप्त केली.
प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन आपल्या शिक्षणाचा उपयोग दलित, शोषित अन दु:खितांना व्हावा हीच बाबासाहेबांची प्रमुख भूमिका होती. १९२० साली कल्याणकारी राजा शाहू महाराज यांच्या प्रेरणेतून आणि साहाय्यातून मूकनायक या पाक्षिक अंकाची निर्मिती केली.
१९२३ च्या कालखंडामध्ये बॅरिस्टर परीक्षा पास होऊन मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. अस्पृश्य निर्मूलन करण्यासाठी व त्यांची शैक्षणिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली. वंचितांच्या प्रश्नासाठी ज्ञानज्योत घेऊनी जाणारा व समाजाबरोबर समूहाचा विकास करणारा महापुरुष म्हणून बाबासाहेबांच्याकडे पाहिले जाते. यांचा आदर्श घेणारी पिढी आपण निर्माण करूया.
१९२० साली माणगाव येथे बहिष्कृत परिषद जेव्हा आयोजित केली तेव्हा त्या परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी डॉ. आंबेडकरांचे काम पाहून आता या दलित बांधवांना माझ्या विचारांपेक्षा आणखी प्रभावी तुमच्या समाजात एक नेतृत्व निर्माण होत आहे. त्याचा तुम्ही स्वीकार करावा
असा मोलाचा संदेश बांधवांना दिला. डॉ. आंबेडकरांना सर्व समाजाने आपला नेता म्हणून स्वीकार केला.
१९२७च्या कालखंडामध्ये महाडच्या चवदार तळ्यावरती या ठिकाणी सत्याग्रह केला व ते महाडाचे चवदार तळे हे दीनदलितांना खुले करून दिले.
बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांमुळे समता प्रस्थापित होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला व १९३५ साली हेच काळाराम मंदिर दलितांच्यासाठी खुले करून दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३५ साली येवला जि. नाशिक या ठिकाणी जाहीर केले होते. हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६ साली स्वत:च्या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.
दलितांच्या विकासासाठी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला आणि याच करारांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांचे प्रश्न या पद्धतीने मांडणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने एक बुद्धिजीवी व्यक्तिमत्त्व होते.
उपेक्षितांच्यासाठी १९४६ साली पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. अशा या महान व्यक्तीचा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंडित जवाहरलाल यांच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री म्हणून समावेश करून घेतला.
१९५६ साली हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथा, रुढी आणि परंपरेविषयी त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा १४ ऑक्टोबर १९५६ रोजी घेतली.
आपल्या हजारो अनुयायांसमवेत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. (Dr Babasaheb Ambedkar Bhashan Marathi) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जाणकार वक्ते तसेच उत्कृष्ट लेखकही होते. त्यांचे लिखाण पाहिले तर निवडक ग्रंथ आपल्यासमोर उभे राहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन गुरूंचाच स्वीकार केला.
महात्मा गौतम बुद्ध, महात्मा कबीर, महात्मा जोतिबा फुले म्हणजेच गुरू कोणाला करावे हे जीवन जगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकण्यासारखे आहे. डॉ. बाबासाहेब एक न्याय प्रतिभावंत वैचारिक तत्त्ववेत्ते म्हणून पाहावयास मिळतात.
अस्पृशांच्या हक्कासाठी अखंड लढा देणारा, वैचारिक क्रांतीची मशाल हातात घेऊन ज्यांच्या घरात ज्ञानाचा अंधार आहे त्यांच्या घरात ज्ञानाचा दिवा घेऊन जाणारा महापुरुष असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख होतो.
१) शुद्र कोण होते २) थॉट्स ऑन पाकिस्तान ३) बुद्धा अँड हिज धम्म ४) द अनटचेबल यासारखी पुस्तके, मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत अशी वृत्तपत्रे सुरू केली होती.
अशा या महान महापुरुषाचे निधन ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे झाले. फुलेंच्या कल्पनेतील सत्यशोधक वृत्ती, आणि शाहू महाराजांच्या विचारातील समता पुढे घेऊन जाणारा एक परिवर्तनाचा शिलेदार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे पाहिले जाते. आजही ज्या विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीएच. डी. शिक्षण पूर्ण केले त्या कोलंबिया विद्यापीठात आंबेडकरांची पीएच.डी. ज्ञानाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.
निष्कर्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ (Dr Babasaheb Ambedkar Speech For Students) भारतातील दलितांचेच नाही तर संपूर्ण समाजाचे मुक्तिदाते होते. शिक्षण, विचारधारा, आणि तत्त्वज्ञानाच्या आधारे त्यांनी एक नवा भारत घडवण्याचा संकल्प केला होता. अस्पृश्यतेच्या विरोधातील त्यांची लढाई आणि सामाजिक न्यायासाठी केलेले काम आजही प्रेरणादायी आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण राष्ट्राला न्याय, स्वातंत्र्य, आणि समतेची शिकवण दिली. त्यांच्या संघर्षाचा आणि क्रांतिकारक विचारांचा वारसा पुढील पिढ्यांसाठी अमूल्य ठरतो.