Mahrashtra HSC Result 2024: बारावीचा निकाल जाहीर, येथे पहा सविस्तर निकाल

HSC Result 2024: बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली!. महाराष्ट्र बोर्ड आज २१ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला.  बारावीचा निकाल विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात. तसेच येथे लाईव अपडेट मध्ये पाहू शकतात. खाली विभागानुसार,मुलींचे, मुलांचे टक्केवारी नुसार निकाल अपडेट केले आहेत. खाली पाहा

बारावी निकाल २०२४

The LiveBlog Has End
21 May 2024 12:05 PM (IST)

बारावी निकाल मोबाईलवर कसा पहायचा?

Step १: सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresults.nic.in ला भेट द्या

Step २: तुम्हाला मोबाईल स्क्रिनवर “HSC Examination February-2024 Result” ही लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

Step ३: नंतर “Roll Number” मध्ये तुमचा परीक्षा क्रमांक भरा आणि “Mothers Name” मध्ये आईचे नाव भरा.

Step ४: वरील माहिती भरुन झाल्यावर “ View Result” वर क्लिक करा.

Step ५: निकाल स्क्रीनवर दिसेल पुढील वापरा साठी निकाल प्रिंट करून ठेवा.


21 May 2024 11:36 AM (IST)

विभागानुसार बारावी निकाल टक्केवारी २०२४

  • कोंकण- 97.51
  • पुणे- 94.44
  • नागपूर- 92.12
  • छत्रपती संभाजीनगर – 94.08
  • मुंबई- 91.95
  • कोल्हापूर- 94.24
  • अमरावती – 93.00
  • नाशिक- 94.71
  • लातूर – 92.36
  • मुंबई- 91.95

21 May 2024 11:27 AM (IST)

बारावी निकाल टक्केवारी २०२४

बारावी निकाल मुलांची टक्केवारी – ९१.६० टक्के

बारावी निकाल मुलींची टक्केवारी – ९५.४४ टक्के


21 May 2024 11:23 AM (IST)

बारावी निकाल लाईव अपडेट २०२४

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून तो ९७.५१ टक्के इतका आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी असून तो ९१.९५ टक्के इतका आहे


21 May 2024 11:10 AM (IST)

Baravi Nikal 2024 Live: टक्केवारी बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला


21 May 2024 11:05 AM (IST)

महाराष्ट्र बोर्ड 12 वी निकाल 2024 लाईव्ह: निकालापूर्वी रोल नंबर तयार ठेवा

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12 वी निकाल 2024 पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांना रोल नंबर आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना निकाल तपासता येणार नाही.


21 May 2024 10:20 AM (IST)

१२वी निकाल २०२४ लाईव्ह: निकालाची महत्त्वाची वेळ

१२वी निकाल २०२४ पत्रकार परिषद वेळ : सकाळी ११ नंतर

ऑनलाइन निकाल वेळ : दुपारी १ वाजता  


21 May 2024 09:40 AM (IST)

बारावी निकाल 2024 लाईव्ह: महत्वाच्या तारखा महाराष्ट्र एचएससी बारावीचा निकाल :

२१ मे (दुपारी १ वाजल्यापासून)

पुरवणी परीक्षा : २७ मे पासून अर्ज आणि जून-जुलैमध्ये परीक्षा होण्याची शक्यता

निकालाचे पुनर्मूल्यांकन : २२ मे ते ५ जूनपर्यंत अर्ज करा

उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळविणे : २६ मे ते १४ जून पर्यंत अर्ज करा.


21 May 2024 09:09 AM (IST)

बारावी निकाल २०२४ वेळ

निकाल जाहीर होण्यास उरले ४ तास बाकी दुपारी १ वाजता होणार ऑनलाइन होणार निकाल जाहीर


21 May 2024 08:50 AM (IST)

महाराष्ट्र बोर्ड एचएससी (12 वी) निकाल 2024: निकाल किती वाजता जाहीर होणार?

बारावी निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होईल.


21 May 2024 08:32 AM (IST)

महाराष्ट्र एचएससी 12 वी निकाल 2024 लाईव्ह: विद्यार्थी या तपशीलांचा वापर करून आपला बारावीचा निकाल पाहू शकतात

रोल नंबर आईचे पहिले नाव


21 May 2024 08:30 AM (IST)

महाराष्ट्र एचएससी बारावीचा निकाल 2024 लाईव्ह: यंदा किती विद्यार्थी बसले

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला यंदा १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी बसले होते. राज्यभरातील ३ हजार १९५ केंद्रांवर फेब्रुवारी-मार्चमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.


बोर्ड महाराष्ट्र बोर्ड
परीक्षा फेब्रुवारी २०२४
निकाल तारीख २१ मे २०२४ | दुपारी १:००
निकाल वेबसाईट mahresults.nic.in

 

DigiLocker App वर करा गुणपत्रिका सेव्ह

डिजिलॉकर ऍप डाउनलोड करा साइन अप करुन एचएससी निकाल २०२४ गुणपत्रिका डिजिटल स्वरूपात सेव्ह करुन घ्या

बारावीच्या परीक्षेत १५ लाखांहून अधिक विद्यार्थी

12वीचा निकाल आज २१ मे २०२४ रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. याबाबत पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात येणार आहे. एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी, टॉपर्सची नावे, प्रवाहनिहाय निकाल अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल. या वर्षी 12वी परीक्षेसाठी एकूण 15 लाख 13 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

बारावी निकाल पाहण्यासाठी वेबसाइटस

महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल २०२४ टॉपर्स लिस्ट

महाराष्ट्र बोर्डाकडून स्काळी १० ते ११ वाजता च्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन बारावीचा बोर्डाचा निकाल जाहीर करेल. तसेच बारावीचा निकाल विभागानुसार टक्केवारीत, तसेच अधिक गुण मिळालेली विद्यार्थी, टॉपर्स लिस्ट, मुलींचा टक्केवारीत निकाल, मुलांचा टक्केवारी निकाल हे महाराष्ट्र बोर्ड पत्रकार परिषदेत अधिकृत जाहीर करेल.

१२ वी चा निकाल फेरतपासणी २०२४

आज बारावी निकाल जाहीर केल्यानंतर जे विद्यार्थी आपल्या निकालावर सहमत नाहीत ते फेरतपासणी साठी अर्ज करू शकतात. महाराष्ट्र बोर्डाने http://verification.mh-hsc.ac.in या लिंक वर अर्ज करण्यासाठी उपलब्ध केली आहे. विद्यार्थी २२ मे २०२४ ते ०५ जून २०२४ पर्यंत आपले अर्ज करू शकतात. तसे अर्ज करताना फी आकारली जाईल. फी Debit Card, Credit Card, UPI पेमेंट करू शकतात.

Leave a Comment