APJ Abdul Kalam Speech In Marathi: तरुणाईचे प्रेरणास्थान ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यावर मराठी भाषण

APJ Abdul Kalam Speech Marathi: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताच्या इतिहासातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आपल्या वैज्ञानिक संशोधनाद्वारे देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाने देशाच्या तरुणाईला स्वप्नं पाहायला आणि त्या स्वप्नांसाठी कार्यरत राहायला शिकवलं. त्यांच्या कार्याचा मागोवा घेताना, ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी भारताची भविष्यातील संकल्पना साकारली, जी प्रत्येक तरुणाच्या मनात प्रेरणा जागृत करते. या लेखामध्ये आम्ही ए.पी.जे अब्दुल कलाम मराठी भाषण लिहिले आहे.

APJ Abdul Kalam Speech In Marathi

माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकाचे लिखाण करून २०-२० साली माझ्या कल्पनेतील भारत कसा असेल? अशी संकल्पना सर्वसामान्य जनतेसमोर आपल्या कल्पक विचारातून स्वप्ने मांडणारे या देशातील तरुणाईच्या ऊर्जेतून देशाचा विकास होऊ शकतो ही ज्या महान व्यक्तींनी आपल्यासमोर मांडले त्या व्यक्तीचे नाव आहे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम.

कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकीर जैमुल्लअब्दिन अब्दुल कलाम असे होय. रामेश्वरजवळ एका खेडेगावात त्यांचा जन्म झाला. वडिलांचा होडीचा व्यवसाय. आपला मुलगा शिकून मोठा व्हावा ही प्रबळ इच्छा त्यांच्या वडिलांची होती. लहानपणापासून कलाम अभ्यासामध्ये प्रचंड हुशार होते.

गणित आणि विज्ञानाची त्यांना प्रचंड आवड. याच दोन विषयाच्या प्रेमाने त्यांना त्यांचे नांव जागतिक कीर्तीपर्यंत पोहोचवता आले. प्राथमिक शिक्षण रामनाथपुरम मद्रास इन्स्टिट्यूट सेन्ट जोसेफ कॉलेज तिरुचिल्लापल्ली या ठिकाणी झाले. १९५८ ते १९६३ या कालखंडामध्ये राष्ट्रीय संशोधन संरक्षण संस्था या ठिकाणी काम केले.

शालेय जीवनामध्ये वर्तमानपत्रे विकली. आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी कमवा आणि शिका या मार्गाचा स्वीकार केला. विक्रम साराभाई यांचे ते शिष्य होते. अमेरिकेमध्ये नासा या संशोधन संस्थेमध्ये ४ महिने प्रशिक्षण घेतले.

आपल्या देशाचा विकास करायचा असेल आणि शस्त्रास्त्राच्या दृष्टीने सक्षम बनायचे असेल तर त्यासाठी स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार केली पाहिजेत ही भूमिका कलाम सरांची होती. त्याच दृष्टीने त्यांनी संशोधनास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र तयार केले.

कलाम सरांचे विज्ञान क्षेत्रातले ज्ञान पाहून, संशोधनातील दूरदृष्टी (Abdul Kalam Marathi Bhashan) पाहून त्यांच्यामध्ये असणारा उत्तम संशोधक. एना राष्ट्रभक्ती असणारा माणूस पाहून त्याच्या कर्तृत्वाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत सरकारने १९९४ साली त्यांना भारताचा सर्वोच्च भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला.

आयुष्यामध्ये शाकाहारी आणि अविवाहित असणाऱ्या या महामानवाने देशातील सर्व तरुणांना एक समोर आदर्श विचार मांडण्याचे कार्य केले. देशभरातून कार्यक्रम, व्याख्यानाच्या माध्यमातून फिरत असताना, उपदेश करताना सर नेहमी सांगत, “देशाची प्रगती युवा शक्तीच्या कतृत्वातून घडत असते.

तुमचे हात देशाच्या विकासासाठी व विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करावी अशी माणसे जेव्हा देशाच्या मातीत निर्माण होतात. तेव्हाच पाय जमिनीवरती ठेवून आकाशाला गवसणी घालणाऱ्या पिढ्या निर्माण होत असतात तेव्हाच देशाचा विकास होत असतो.’

आपल्याला देशाचा विकास करायचा असेल व देशाला महासत्ता बनायचे असेल तर आपण कृतिशील विचारांची जोड दिली पाहिजे हेच विचार कलाम सरांनी सर्व माणसांच्या मनावरती बिंबवण्याचे काम केले. कलाम सरांचे हे काम पाहून देशाचे अकरावे राष्ट्रपती म्हणून २००२ – २००७ या कालखंडात निवड झाली.

देशातल्या लोकांना स्वप्ने दाखवणारा, स्वप्नपूर्तीसाठी विचार रुजवणारा एक ध्येयवादी व्यक्ती म्हणून कलामसरांचा उल्लेख केला जातो. देशाच्या विकासासाठी आजच्या पिढीने शेतीबरोबर तंत्रज्ञान, मातीबरोबर माणूसकी शिक्षणाबरोबर सहकाराच्या प्रगतीला गवसणी घालणारी पिढी जेव्हा निर्माण होईल तेव्हाच भारत महासत्ता बनेल.

सामान्य कुटुंबातील तरुण, संशोधक, शास्त्रज्ञ ते देशाचे राष्ट्रपती. पिढी घडविणारा, घडवण्याचे संस्कार देणारे किमयागार म्हणजेच ए. पी. जे. अब्दुल कलाम होय!

निष्कर्ष

डॉ. कलाम हे केवळ वैज्ञानिक किंवा राष्ट्रपती नव्हते, (अब्दुल कलाम भाषण मराठीत) तर त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक कार्याने देशाच्या तरुणाईला नवीन दिशा दिली. त्यांच्या विचारांनी आणि कार्यप्रणालीने भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न दाखवले. युवा शक्तीच्या माध्यमातून देशाच्या विकासाची संकल्पना त्यांनी मांडली, जी आजही आपल्यासाठी मार्गदर्शक ठरते. त्यांचे जीवन व कार्य हे प्रेरणादायी आदर्श आहेत, जे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहेत.

Leave a Comment