Pune: दुखवलेल्या नेत्यांना संभाळून घेण्याची माझी नैतिक जबाबदारी: सुप्रिया सुळे

बारामती, ७ ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूरमधील पक्षप्रवेश कार्यक्रमात एक महत्त्वपूर्ण विधान करताना सांगितले की, पक्षातील दुखवलेल्या नेत्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वाबद्दलच्या त्यांच्या भूमिकेची आणि निष्ठेची पुन्हा एकदा पुष्टी झाली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक लोकांनी माझ्या विरोधात काम केलं, परंतु मी या गोष्टींना मनावर घेतलं नाही. मी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आभार मानते की त्यांनी या संघर्षाच्या काळातही माझ्यासोबत उभं राहून मला साथ दिली. जे काही नेते या काळात दुखवले गेले, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी माझी आहे.” (Supriya Sule Marathi News)

सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले की, हर्षवर्धन पाटील आणि पवार कुटुंब यांच्यातील कौटुंबिक नातं अनेक दशकांपासून टिकलेलं आहे. “आमचं नातं फक्त राजकीय नाही, तर कौटुंबिक आहे. त्यामुळे इथे कटुता निर्माण होईल, असं कधीच घडणार नाही. आम्ही प्रेमाने नाती जपणारे लोक आहोत,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

नाराज नेत्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या

“लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडायचा आणि उमेदवारी मागायचा अधिकार आहे. जर कोणी इच्छुक असतील, तर त्यांना उमेदवारी मागायला पूर्ण मुभा आहे. परंतु अंतिम निर्णय पक्षाची स्टेअरिंग कमिटी घेईल. नाराजी काही लोकांमध्ये असू शकते, पण ती आम्ही दूर करण्यासाठी काम करत आहोत.” (Marathi News)

महाविकास आघाडीच्या यादीवर विचारलं असता

सुळे यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “दसऱ्यापर्यंत महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होईल. जयंतराव आणि इतर नेते यावर काम करत आहेत, आणि येत्या काळात सर्व चित्र स्पष्ट होईल.”

Leave a Comment