[PDF] हरतालिका कथा आणि आरती मराठी Pdf Download Free| Hartalika Katha Aarti Lyrics In Marathi Best 2024

या पोस्ट मध्ये आपण Hartalika Katha Aarti Lyrics In Marathi / हरतालिका आरती कथा मराठी मध्ये पाहणार आहोत

Hartalika Katha Aarti Lyrics In Marathi

Hartalika Katha Aarti Lyrics In Marathi

हरितालिका कहाणी मराठी 

कहाणी हरितालिकेची एके दिवशी शंकरपार्वती कैलासपर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते ?

श्रम थोडे, आणि फळ पुष्कळ, असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेहि मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. ( Haritalika Story In Marathi )

तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस.

हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं विष्णूलाना रदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारल. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे ती द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलो आहे.

हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे आले. त्यांना ती हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारदं गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या
सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस,
महादेवावाचून मला दुसरा पति करणे नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा?

मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतियेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पति व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. ( हरतालिका मराठी कथा दाखवा )

मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथ आला. त्यानं तुला इकड पळून कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढे त्यान तुला मलाच देण्याचं वचन दिल. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं येण्याचं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे.

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात.

दळिद्रं येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यशाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ (संपूर्ण). (हरतालिका व्रत कथा मराठी )

श्री हरितालिकेची आरती | Hartalka Aarti Marathi Lyrics Download

जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके।
आरती ओवाळीते । ज्ञानदीपकळिके॥धृ०॥

हरिअर्धांगी वससी | जासी यज्ञा माहेरासी।
तेथे अपमान पावसी यज्ञकुंडी गुप्त होसी॥ जय०॥१॥

रिघसी हिमाद्रीच्या पोटी। कन्या होसी तू गोमटी।
उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी॥जय० २॥

तापपंचाग्निसाधने। धूम्रपाने अधोवदने।
केली बहु  उपोषणे।। शंभु भ्रताराकारणे॥जय० ॥३॥ ( Haritalika Aarti Marathi Madhe )

लीला दाखविसी दृष्टी। हे व्रत करिसी लोकांसाठी।
पुन्हा वरिसी धूर्जटी। मज रक्षावे संकटी।। जय० ॥४॥

काय वर्ण तव गुण। अल्पमति नारायण।
माते दाखवी चरण। चुकवावे जन्म मरण। जय देवी०॥५॥

hartalika katha marathi pdf download | हरितालिका कथा मराठी पीडीएफ डाउनलोड

Download

हे पण वाचा

आम्हाला आशा आहे की हरतालिका कहाणी मराठी मध्ये, Hartalika Kahani In Marathi, Hartalika Vrat Katha In Marathi, हरतालिका आरती मराठी मध्ये, हरतालिका व्रत आरती मराठी Pdf, Hartalika Aarti In Marathi ही पोस्ट नक्की आवडली असेल धन्यवाद

Leave a Comment