मी पाहिलेले वृद्धाश्रम मराठी निबंध | Me Pahilele Vruddhashram Essay In Marathi

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण मी पाहिलेले वृद्धाश्रम निबंध लेखन 100 शब्दांमध्ये करणार आहोत.

Mi Pahilele Vruddhashram Marathi Nibandh / मी पाहिलेले वृद्धाश्रम मराठी निबंध

Me Pahilele Vruddhashram Essay In Marathi
Me Pahilele Vruddhashram Essay In Marathi

निबंधलेखन 
कल्पनात्मक निबंध – मी पाहिलेले वृद्धाश्रम

[मुद्दे : वृद्धाश्रमात जाण्याची संधी- आश्रमाचे स्थान – आश्रमातील वातावरण – वृद्धांची ओळख करून घेतली – त्यांची कामे केली.]

आमच्या गावाच्या शेजारी एक वृद्धाश्रम आहे. एके दिवशी आईच्या मैत्रिणी तेथे जात होत्या. आईपण त्यांच्याबरोबर चालली होती. आईने मलाही त्यांच्यासोबत नेले. आम्ही दुपारी अकराच्या सुमारास आश्रमात गेलो. आश्रमाचे आवार खूप मोठे होते. त्या आवारात खूप झाडे होती. त्यामुळे तेथे सावली होती. आम्ही गेलो, तेव्हा काही आजी-आजोबा आवारात हिंडत होते. काहीजण सावलीत बसून गप्पा मारत होते. कुणी आजोबा वर्तमानपत्र वाचत होते.

आई व तिच्या मैत्रिणी त्यांच्याशी गप्पा मारू लागल्या. आईने सर्वासाठी लाडू करून नेले होते. ते मी सर्व आजी-आजोबांना वाटले. मग आई व तिच्या मैत्रिणी काही आजोबांशी बोलल्या. त्या आजोबांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या.

एका आजोबांना त्यांच्या घरी पत्र पाठवायचे होते. त्यांनी मजकूर सांगितला व मी ते पत्र लिहून दिले. ठीक बारा वाजता जेवणाची घंटा झाली, मग सर्व आजीआजोबा मोठ्या हॉलमध्ये जमले. त्यांनी प्रार्थना म्हटली आणि भोजन सुरू झाले. मीपण त्यांच्याबरोबर तेथे जेवले. जेवण साधेच, पण रुचकर होते. दुपारी चहापान झाल्यावर आम्ही परतलो

वरील निबंध हा खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • मी पाहिलेले वृद्धाश्रम  निबंध मराठी / me pahilele vruddhashram nibandh marathi
  • वृद्धाश्रम  निबंध मराठी / vruddhashram nibandh mara
  • वृद्धाश्रम वर  निबंध / Old Age Home essay in marathi

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा मी पाहिलेले वृद्धाश्रम मराठी निबंध कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद