Pune: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात चार हफ्त्यांचे पैसे जमा झाल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे, आणि लवकरच पाचवा व सहावा हफ्ताही जमा केला जाईल. मात्र, आता या योजनेबाबत एक मोठी अफवा पसरली आहे. सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहेत की या योजनेअंतर्गत महिलांना मोफत मोबाईल फोन दिले जाणार आहेत.
हे मेसेज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असले, तरी या दाव्यांमध्ये काहीच सत्यता नाही. राज्य सरकारने मोबाईल गिफ्ट देण्यासंबंधी कोणताही निर्णय घेतलेला नाही, तसेच या प्रकारचे कोणतेही फॉर्म जारी केलेले नाहीत. (Ladki Bahin Yojana)
याआधीही लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या आहेत, जिथे डमी अर्ज भरून पैसे हडप केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशा अफवांना बळी न पडता महिलांनी सावध राहावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.