Ladki Bahin Yojana 4th and 5th Installment: लाडकी बहीण योजनेचा चौथा व पाचवा हप्ता जमा, या कारणांमुळे नाहीत आले काही महिलांचे पैसे

पुणे, ७ ऑक्टोबर २०२४:लाडकी बहीण” योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत देण्यात येत आहे. या योजनेत आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये पैसे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. आता चौथा आणि पाचवा हप्ता दिवाळीच्या आधीच जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही महिलांच्या बँक खात्यावर चौथा आणि पाचवा हप्ता जमा झालेला आहे, परंतु काही महिलांचे पैसे अजून येणे बाकी आहे.

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या सर्व पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना पात्र ठरवण्यात आले आहे, परंतु अनेक महिलांना अजून एक रुपयाही मिळालेला नाही.

या कारणांमुळे नाहीत आले तुमचे पैसे

लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना पैसे मिळवण्यासाठी त्यांच्या बँक खात्याला आधार कार्डाशी लिंक असणे आवश्यक आहे. बरेच जण आधार कार्ड लिंक न झाल्यामुळे पैसे खात्यात येण्यात अडचणीत आहेत. काही महिलांनी जॉईन खाते दिलेले असून, या योजने अंतर्गत महिलांचे वैयक्तिक खाते असणे आवश्यक आहे. यामुळे अनेक महिलांचे अनुदान थांबवण्यात आले आहे.

तसेच, ग्रामीण भागातील काही बँकांमध्ये केवायसीची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे महिलांना पैसे मिळत नाहीत. यासाठी, महिलांना आपल्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्याचा सल्ला दिला जात आहे. हे खाते उघडल्यास आधार कार्ड स्वयंचलितपणे लिंक होईल.

कधी पर्यंत येतील राहिलेल्या लाडक्या बहिणीचे पैसे

योजनेच्या योग्य प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिलांना १० ऑक्टोबरपर्यंत पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात योग्य माहिती मिळवून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये.

महिलांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या बँक खात्याची स्थिती तपासावी आणि आवश्यक त्या दुरुस्त्या करून आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी तयार राहावे.