आज या पोस्ट मध्ये आपण Gauri Avahan Muhurt Pujan In Marathi / ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त 2023 मराठी, पूजा, विसर्जन कसे करावे 2023 हे पहाणार आहोत
Gauri Avahan Muhurat Pujan In Marathi
हिंदू धर्म शास्त्रात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहेत. एकदा अस्वरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया गौरी महालक्ष्मी कडे गेल्या आणि आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी त्याची प्रार्थना केली त्याला अनुसरून गौरीने अस्वरांचा संहार केला आणि शरण आलेल्या स्त्रियांच्या पतीला व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले महालक्ष्मीच्या कृपेने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरी ची पूजा करू लागल्या.
भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलचाराप्रमाणे महालक्ष्मीची पूजा व स्थापना केली जाते. गौरी पूजन हे भाद्रपद महिन्यातील सर्व स्त्रियांचे महत्त्वाचे व्रत आहे आपल्या महाराष्ट्रात एक सण म्हणून हे व्रत साजरे केले जाते यालाच गौरी महालक्ष्मी पूजन म्हणतात.
ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त 2023| Gauri Avahan Muhurt 2023
तारीख | वेळ |
21 सप्टेंबर 2023 | सकाळी 06:09 AM ते दुपारी 03:34 PM |
ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त हा सकाळी 06:09 ते दुपारी 03:34 पर्यंत मुहूर्त आहे म्हणजे एकूण 9 तास 25 मिनिटे वेळ मुहूर्त वेळ आहे.
गौरीच्या मांडनिच्या विविध पध्दती आपल्याला दिसून येतात अनेक रूपांमध्ये गौरि व महालक्ष्मी आपल्याकडे येत असतात. आगमनाच्या दिवशी पंचगणात शुभ वेळ पाहून मुकवट्यांची व लक्ष्मी च्या हातांची पूजा केली जाते आणि त्याच दिवशी गौरी उभ्या केल्या जातात. जो पहिला दिवस असतो त्याला गौरी आवाहन असे म्हणतात.
ज्येष्ठा गौरी आवाहन कसे करावे 2023? Gauri Avahan Pujan 2023
परांपरे प्रमाणे गौरी आत आणताना ज्या महिलेच्या हातात गौरी असतील त्या महिलेचे पाय पाण्याने व दुधाने धुवा आणि त्यावरती कुंकाने स्वस्तिक काढा.
घरच्या उंबऱ्यातून आत येताना पाच धान्याचे स्टील चे ग्लास भरून ठेवा आणि पाच पावले ग्लास ओलांडून लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमठावा त्यावेळी ताट चमचेने किंवा घंटेने आवाज निर्माण करावा यानंतर गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यानं घरातील देवघरासमोर ठेवून घरात ऐश्वर्य नांदो व वैभव निर्माण होवो समृध्दी येवो अशी प्रार्थना करून भाजी आणि भाकरी चा नैवेध्य दाखवा.
त्यानंतर गौरि महालक्ष्मीना उभे करून त्याना साडी, दाग दागिने घालून सजवा आणि गौरी महालक्ष्मी समोर काही खेळणे असतील तर ठेवावी अशा प्रकारे गौरी आवाहन संपन्न होते
ज्येष्ठा गौरी पूजन कसे करावे 2023? Gauri Pujan Kase Karave?
पहिल्या दिवशी गौरी आवाहन पूर्ण केल्यावर दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करतात.
सकाळी गौरींची पूजा आरती करून बनवलेले फराळ जसे की रव्याचे लाडू, शंकरपाळ्या, शेव, करंजी, चकली इ. नैवेध्य दाखवावा. दुपारी पूरण पोळी, सोळा भाज्या एकत्र कराव्यात, देव फळ, आंबड्याची भाजी, कडी, शेंगदाण्याची चटणी, डाळीची चटणी, पापड, भजी, इ. बनवून नैवेध्य दाखवा.
सायंकाळी हळदी, कुंकाचा कार्यक्रम ठेवावा. ज्या महिला किंवा मुली दर्शनाला तसेच गौरी पाहण्यासाठी येतील त्यांचे आधराने स्वागत करावे अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी गौरी पूजन संपन्न होते.
ज्येष्ठा गौरी विसर्जन कसे करावे 2023? Gauri Visarjan Kase Karave?
तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते.
या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडाव्यात, त्या सुतात हळदी, कुंकू, बेल फळ, झेंडूची पाने, झेंडूची फुले, काशी भोपळा फूल, रेशमी धागा यांचे प्रत्येकी एक एक गाठ बांधून गाठी तयार कराव्यात. गौरी महालक्ष्मीच्या ओठीत किंवा डोक्यावर ठेवा नंतर गौरी महालक्ष्मी ची आरती करून गूळ आणि गोड शेवयांचा नैवेध्य दाखवा आणि विसर्जन कराव्यात.
हे पण वाचा:
ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त 2023?
21 सप्टेंबर 2023 रोजी 10:56 PM पर्यन्त
ज्येष्ठा गौरी आवाहन च्या दिवशी महालक्ष्मीला कशाचा नैवेध्य दाखवावा?
भाजी भाकरीचा नैवेध्य दाखवावा
ज्येष्ठा गौरी विसर्जन कधी आहे 2023?
23 सप्टेंबर गौरी विसर्जन आहे
अशा प्रकारे आपण या पोस्ट मध्ये Gauri Avahan Muhurt 2023 Marathi, Gauri Visarjan 2023 , Gauri Pujan vidhi 2023 , Gauri Pujan kase karave in marathi, ज्येष्ठा गौरी पूजन 2023 , ज्येष्ठा गौरी पूजा विधी मराठी 2023,ज्येष्ठा गौरी विसर्जन कसे कारायचे मराठी माहिती, ज्येष्ठा गौरी गणपती 2023 मराठी, ज्येष्ठा गौरी गणपती माहिती मराठी, ज्येष्ठा गौरी गणपती महालक्ष्मी पूजन कसे करावे दाखवा, ज्येष्ठा गौरी घरात कशा आणाव्यात? हे माहिती सांगितलेली आहे तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल.