आजपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रवेश परीक्षा
SPPU Entrance Tests Begins Today प्रवेशासाठी २१ हजार सहाशे अर्ज: २१ ते २४ जुलै दरम्यान होणार परीक्षा
पुणे, दि.२० – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून त्याची प्रवेश परीक्षा आजपासून (दि.२१) पासून सुरू होत आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण २१ हजार ६७० अर्ज आले आहेत. महाराष्ट्रासह भारतभरातील २२ केंद्रांवर ही पदवी आणि पदव्युत्तर ( sppu entrance exam 2022) प्रवेशासाठीची ही ऑनलाईन परीक्षा २१ ते २४ जुलै दरम्यान होणार आहे. ही परीक्षा शंभर गुणांची असून यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे.
ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज आले आहेत त्या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा होणार नसल्याचे विदयाथ्योंना मेलच्या माध्यमातून कळवले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची ही प्रवेश प्रक्रिया होत असून याअंतर्गत पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, पदव्युत्तर पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा एकूण १७४ अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे.
त्यामधील ९३ अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा २१ ते २४ जुलै दरम्यान होणार आहे. या १७४ अभ्यासक्रमाच्या एकूण ७ हजार ८५० जागा उपलब्ध आहेत. ( sppu entrance test date ) विद्यार्थ्यांनी केंद्रांवर जात ही परीक्षा द्यायची असून यासंबंधी सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली असल्याचे विद्यापीठ प्रवेश विभागाकडून सांगण्यात आले आहे.
प्रवेश परीक्षेसाठी आलेले अर्ज
पदवी | ७४८ |
पदव्युत्तर पदवी | १८२७० |
पदविका | ७२५ |
पदव्युत्तर पदविका | ९०९ |
प्रमाणपत्र अभ्यासक्रम | १०१८ |