Gautam Buddha Speech Marathi: गौतम बुद्ध हे जगाला शांततेचा आणि मानवतेचा संदेश देणारे महापुरुष होते. त्यांच्या पंचशील तत्त्वांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना सत्याचा मार्ग दाखवला आणि अष्टांग मार्गाच्या सहाय्याने दुःखमुक्त जीवनाचा शोध दिला. त्यांच्या शिकवणीने लाखो लोकांचे जीवन बदलले आणि आजही करोडो अनुयायी त्यांच्या विचारांचे पालन करत आहेत. अशाच महापुरुषाचे या लेखामध्ये गौतम बुद्ध यांच्यावर भाषण लिहिले आहे.
Gautam Buddha Speech In Marathi
जगाला शांततेचा संदेश देणारे आपल्या पंचशील तत्त्वामध्ये संपूर्ण भूतलावरील लोकांना सत्याचा मार्ग दाखवून दुःखाचे समूळ उच्चाटन करणारा शोध घेऊन समाजातल्या लोकांना अष्टांग मार्ग दाखवून लोकांना दु:खाचा संयमाच्या दिशेने घेऊन जाणारे महापुरुष म्हणून गौतम बुद्ध यांच्याकडे पाहिले जाते.
गौतम बुद्धांचा जन्म इ. स. पू. ५६३ वैशाख पौर्णिमेला कपिला वस्तू येथे झाला. त्यांचे वडील शाक्य राजा शुद्धोदन, माता मायादेवी यांच्या पोटी झाला. लहाणपणापासूनच बुद्ध गौतम बुद्धांच्या मनामध्ये एक वेगळी कुशाग्र बुद्धिमत्ता होती. लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे पालनपोषण, संगोपनाची जबाबदारी महाप्रजावती नावाच्या मावशीवर पडली.
गौतम बुद्ध हे अत्यंत मनमिळावू होते. सर्वसामान्य मनुष्याचा विचार करणारे होते. दु:खाचा शोध घेऊन सुखाच्या दिशेने वाटचाल करायला लावणारे व अनुयायांची जडण-घडण करणारे, सत्य प्रचाराने लोकांची मने जिकणारे होते. समाजातील जाती व्यवस्था यांचा निषेध करून गुलामगिरीने ज्या कालखंडामध्ये मनुष्याला पशुत्वाची वागणूक मिळत होती.
अशा कालखंडामध्ये गौतम बुद्धाने या रूढी, परंपरा, कर्मकांड यांना झुगारून बौद्ध धर्माची स्थापना केली. या धर्माच्या माध्यमातून मानवतेचा, शांततेचा संदेश देण्याचे कार्य केले. गृहत्याग केलेल्या गौतम बुद्धांनी बोधी वृक्षाच्या छायेखाली बसून प्रचंड ध्यानधारणा केली.
मनुष्याच्या दुःखाच्या कारणांचा शोध घेतला. मानवी मनात असणारे भय नष्ट करण्यासाठी बुद्धांनी आपल्या वाणीतून, विचारातून सर्वसामान्य जनतेचे प्रबोधन केले. देशभर भ्रमंती करत असताना आपले शिष्य निर्माण केले. आपल्या संघामध्ये सर्वसामान्य लोकांना सामावून घेतले.
मूर्तीपूजा, अंधश्रद्धा, हिंसा, मद्यपान या गोष्टींना विरोध केला व लोकांचे प्रबोधन केले. ज्या कालखंडामध्ये स्त्रियांना हीनतेची वागणूक मिळत होती त्या कालखंडामध्ये स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी गौतम बुद्धांनी प्रयत्न केले. कपील वस्तू येथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बुद्धांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग हा सामान्य जनतेसाठी केला.
गृहत्याग केल्यानंतर वैराग्य पत्करून धम्मचक्र प्रवर्तन केले. जीवनामध्ये सदाचाराची मूलतत्त्वे, शीलमार्ग यांची जपणूक केली. बुद्ध स्वतः धम्म प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संपूर्ण देशभर फिरले. गावोगावी फिरताना त्यानी विहारात मुक्काम केला. सामान्य मनुष्याप्रमाणे ते आपले जीवन जगत. बुद्धांचे कार्य महती पाहून इतर धर्मांतले लोकसुद्धा बुद्धांचे अनुयायी होऊ लागले.
हा माणूस अंगावरच्या राजवस्त्रांचा त्याग करून सामान्य माणसाप्रमाणे वागत होता. (गौतम बुद्ध यांच्यावर मराठी भाषण) अंगुलिमाल नावाच्या राक्षसी वृत्तीच्या माणसाच्या मनाचे परिवर्तन करत असेल तर निश्चित हा माणूस मोठा आहे. असे सामान्य माणसाला वाटत होते. यामुळे गौतम बुद्धांची लोकप्रियता वाढत गेली.
वेगवेगळ्या राजा-महाराजांनी गौतम बुद्धांना आपल्या प्रांतामध्ये आमंत्रित करून त्यांचे विचार ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते. ज्ञानाचा सागर म्हणून बुद्धांच्याकडे पाहिले जात होते. ज्यावेळी अनुयायांनी बुद्धांना विचारले. आपण बुद्ध धर्माची स्थापना का केली त्यावेळी बुद्धांनी सांगितले.
जातीयता, अज्ञान हे नष्ट करण्यासाठी या धर्माची स्थापना केली. बुद्धांनी पहिले प्रवचन सारनाथ या ठिकाणी केले. बौद्ध धर्माची स्थापना करून मानवतावादी विचार लोकांच्यासमोर प्रकट केले. यामुळेच मोठमोठे राजेसुद्धा त्यांचे अनुयायी बनले.
हेच गौतम बुद्धांचे मोठेपण होते. अशा या महान मानवाचा मृत्यू वयाच्या ८० व्या वर्षी इ. स. पूर्व ४८३ रोजी झाला. सत्याचा मार्ग दाखवणारा एक महापुरुष म्हणून गौतम बुद्धांच्याकडे पाहिलं जातं. आज बुद्धाच्या बौद्ध धर्माचा प्रसार झालेला पाहावयास मिळतो. बुद्धांच्या विचाराचे आचरण करणारे आज करोडो अनुयायी जगभरात पाहावयास मिळतात.
निष्कर्ष
गौतम बुद्धांनी दिलेला सत्याचा मार्ग आणि मानवतावादी विचार (Gautam Buddha Marathi Speech For Students) आजही जगभरात आदरपूर्वक अनुसरले जातात. त्यांनी स्थापित केलेल्या बौद्ध धर्मामुळे समाजात शांती, समानता, आणि सहिष्णुतेचे विचार रुजवले आहेत. अशा या महान महापुरुषांच्या विचारांचे आचरण करून आजही करोडो अनुयायी त्यांचा आदर्श मानतात.